Home Breaking News निवडणूकीत अर्ज मागे घेरल्यास निवडणूक खर्च भरायची गरज नाही

निवडणूकीत अर्ज मागे घेरल्यास निवडणूक खर्च भरायची गरज नाही

उच्च न्यायालयात दोन ग्रापंचायत सदस्यांची अपात्रता रद्द

नागपूर : दोन प्रभागात अर्ज भरून एक अर्ज मागे घेत एक प्रभागात निवडून आलेल्या जागे बाबत वेळेत खर्च सादर करूनही मागे घेतलेल्या अर्ज बाबतीत निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्यामुळे सदश्य म्हणून जिल्हाधिकारी यांनीअपात्र केलेला आदेश रद्द करत दोन ग्रामपंचायत सदश्याना पूर्ववत सदस्य पदावर कायम ठेवले
बुलडाणा जिल्ह्यातील भाडगनी ता मलकापुर येथील सौ इंदूबाई खोड़के आणी शीतल गोरे यांनी पहिल्या व दुसऱ्या वार्ड मधे असे एक एक अर्ज दाखल करून अर्ज मागे घ्यायच्या दिवशी एक अर्ज कायम ठेवून दूसरा अर्ज मागे घेतला होता , 18 जानेवारी 2021 ला दोघेही निवडून आले व निवडून आलेल्या जागे बाबत निवडणूक खर्च पन वेळेत सादर केला ,असे असताना जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी 28 जून 2021 च्या आदेश्याणे अर्ज मागे घेतला त्या जागे बाबत विहित मुदतित निवडणूक खर्च सादर न केल्याचे नमूद करून त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावर राहण्यास अपात्र केले , त्याला दोन्ही सदश्यांनि उच्य न्यायालयाच्या नागपुर खण्डपीठात आव्हान दिले असता अन्तरिम आदेश्याद्वारे पदाना संरक्षण दिले होते ,दरम्यान याचिका प्रलंबित असताना महारास्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 7 स्प्टेबर रोजी आधिच्या आदेशयात स्पष्टीकरण देत उमेद्वाराने अर्ज मागे घेतला असल्यास त्या प्रसंगी निवडणूक खर्च सादर करायची गरज नसल्याचे स्पष्ट केल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खण्डपीठाने अपात्रता आदेश रद्द केले  याचिकाकर्ता च्या वतीने  अँड प्रदीप क्षीरसागर यानी काम पाहिले.

अँड प्रदीप क्षीरसागर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here