Home बुलडाणा जिल्हा वृत्त मोताळा नगर पंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार !

मोताळा नगर पंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार !

मोताळा : महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचे निमित्त साधून मोताळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर राष्ट्रवादी यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पक्षनिरीक्षक रविंद्र तौर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी, बूलढाणा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नरेश शेळके, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.अनुजा साळवे, पी.एम.जाधव, जिल्हाध्यक्ष, सहकार सेल, मनोज दांडगे जिल्हाध्यक्ष, कामगार सेल, संतोष पाटील जिल्हाध्यक्ष सेवादल , शेखर बोन्द्रे, जिल्हाध्यक्ष, युवक अतुल लोखंडे, माजी नगरसेवक, प्रा. भूषण दाभाडे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष, बुलडाणा उपस्थित होते.
या बैठकीत पक्ष संघटनात्मक आढावा, चर्चा व पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी सक्षम होण्यासाठी एकत्र काम करण्याची ताकीद देण्यात आली. मा. रविंद्रजी तौर साहेबांनी तालुकाध्यक्ष,शहर अध्यक्ष, सर्व सेलचे पदाधिकारी यांच्या कार्याचा आढावा घेऊन पक्षाचे कार्य वाढविण्यासाठी राञंदिवस एक करून येत्या निवडणुकीत मोताळा नगर पंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला. या बैठकीत मध्ये नाझेर काझी यांनी शहरात पक्षाची ताकद वाढल्याचे स्पष्ट केले आणि स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका असे कार्यकर्त्यांना संबोधित करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व तालुक्याची प्रगती करण्यासाठी सक्षमपणे जिल्ह्याचे नेतृत्व ना. डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब, व मी आपल्या सोबत आहे, विकासकामे मार्गी लावण्यासाठी सदैव सोबत असेल पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी समन्वय साधून सशक्त तरुणांचा सहभाग घेऊन, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शना सह मेहनत करा, मोताळा नगर पंचायत व मोताळा तालुक्यातुन स्वराज्य संस्था मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार विजयी करा असे आवाहन केले. सुनिल घाटे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मोताळा यशवंतराव धाबे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बुलडाणा, रविभाऊ पाटील,कायम निमंत्रित सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बुलडाणा, जवरे पाटील, प्रा.ओमप्रकाश बोर्डे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष, प्रमोद कळस्कर, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मोताळा शहर सुनील कोल्हे, जिल्हा सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बुलडाणा, डाॅ.शरद काळे, माजी जिल्हाध्यक्ष, डॉक्टर सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बुलडाणा मोबीन अहमद, जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवन मेहेंगे, तालुकाध्यक्ष, वक्ता सेल,मोताळा सुशिल इंगळे,युवा पानपाटील, बगळे यांनी मोताळा नगर पंचायत वर झेंडा फडकवण्याचा निर्धार करून आश्वासन दिले. सर्वांत मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शहरात बनेल व जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक येणार असे जाहीर केले. या बैठकीला यशस्वी करण्याची जबाबदारी व उपस्थितीत सुनिल घाटे, डाॅ. शरद काळे, प्रमोद कळस्कर, अबरार कूरेशी, अनिल भगत, सुनिल कोल्हे, शफिक, अब्दुला पठाण,बगळे, वैभव उघडे, सुधाकर सूरडकर, महादेव कर्णार यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित राहून आढावा बैठकीत एकजूट होऊन कार्य करण्याचा निर्णय घेतला.

सदर आढावा बैठकीचे सुत्रसंचलन अॅड. पवन मेहेंगे, तालुकाध्यक्ष, वक्ता सेल, मोताळा तर आभार प्रदर्शन श्री. सुनील घाटे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मोताळा यांनी केले.