Home नांदुरा चांगल्या कार्याची पावती !ओमसाई फाऊंडेशनच्या जीवरक्षकांना तहसीलदारांनी केला ‘असा’ सन्मान

चांगल्या कार्याची पावती !ओमसाई फाऊंडेशनच्या जीवरक्षकांना तहसीलदारांनी केला ‘असा’ सन्मान

नांदुराः व्रतस्थपणे आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या शहरातील सेवाभावी ओमसाई फाऊंडेशनच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून गणरायाच्या विसर्जनदिनी कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पूर्णा नदीवर जीवरक्षकांची तैनाती करून श्रीं च्या चरणी आपली वेगळी सेवा अर्पण करीत असतात यावर्षीसुद्धा जीवरक्षकांची रुग्णवाहिका व संपूर्ण सुरक्षा साहित्यासह विसर्जनस्थळी तैनाती करण्यात आली होती यादरम्यान विसर्जनाला आलेल्या दोन युवकांना पाण्यात बुडत असतांना उपस्थित जीवरक्षकांनी आपल्या प्राणाची बाजी लावत त्यांना जीवदान दिले याच धाडसी कार्याची दखल घेऊन नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांनी महात्मा गांधी जयंती दिनी एका छोटेखानी कार्यक्रमात फाऊंडेशनच्या प्रत्येक स्वयंसेवकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी गटविकास अधिकारी समाधान वाघ,मुख्याधिकारी आशीष बोबडे,पाणीपुरवठा अभियंता निरज नाफडे,आदी अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर ओमसाई फाऊंडेशन चे विलास निंबोळकर, पियुष मिहाणी,कपिल पाटील, राम काळदाते, आश्वीन फेरण, श्रीराम निंबोळकर, श्याम जुमळे,आदी स्वयंसेवक आवर्जून उपस्थित होते