Home Breaking News ऐकून तुम्ही विचारातच पडाल, शाहरुखच्या मुलाची केस लढणारे वकील दिवसाला घेतात...

ऐकून तुम्ही विचारातच पडाल, शाहरुखच्या मुलाची केस लढणारे वकील दिवसाला घेतात ‘इतकी’ फिस!

मुंबई : अभिनेता शाहरुख खान सध्या आणखी एका प्रकरणाने चर्चेत आला आहे त्याच्या मुलास ड्रेस प्रकरणात अटक झाली असल्याने राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात मुलगा आर्यनची तुरुंगातून सुटका करण्यासाठी अभिनेता शाहरुख खानने प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे यांची नियुक्ती केली आहे. या वकील साहेबांची फीस ऐकून तुम्ही थक्क व्हाल एवढे मात्र नक्की !

राज्यामध्ये अनेक हाय प्रोफाईल आणि नामांकित वकील आहेत त्यापैकीच एक सतीश माने शिंदे ओळखले जातात त्यांनी आजवर अनेक मोठ्या केसेस लढल्या आहेत.
सतीश मानेशिंदे हे हाय-प्रोफाईल वकील असून ते कोर्टात आर्यनची बाजू मांडणार आहेत. सतीश यांनी याआधी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, सलमान खान आणि संजय दत्त यांच्या केसेससुद्धा हाताळल्या होत्या. मानेशिंदे यांना भारतातील प्रसिद्ध वकिलांपैकी एक मानलं जातं.

प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली १९८३ साली सतीश मानेशिंदे यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. त्यांनी दहा वर्षे जेठमलानी यांच्यासोबत काम केलं होतं. मानेशिंदे हे ५१ वर्षांचे असून त्यांना महागड्या गाड्यांची आवड असल्याचं म्हटलं जातं.

मानेशिंदे यांनी १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणात सलमानची आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तची बाजू मांडली होती. त्यांनी सलमानला ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात जामिनही मिळवून दिला होता. ते देशातील महागड्या वकिलांपैकी एक असून २०१० मधील एका रिपोर्टनुसार ते दिवसाला १० लाख रुपये इतकी फी घेतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती अडचणीत आली होती. त्यावेळी कोर्टात रियाचा बचाव मानेशिंदे यांनीच केला होता.