Home कृषि वार्ता आता शेतकऱ्यांना मिळणार डिझिटल सातबारा ; आमदार फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन

आता शेतकऱ्यांना मिळणार डिझिटल सातबारा ; आमदार फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन

 

खामगाव : गांधी जयंती निमित्य महसूल विभागामार्फत डिजिटल अद्यावत 7/12 चे एकदा मोफत वाटप कार्यक्रमाचे खामगांव महसूलचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी खामगाव तालुक्यातील विहिगाव येथे आयोजित केला होता याठिकाणी प्रायोगिक तत्वावर 10 शेतकऱयांना डिजिटल 7/12 चे मोफत वितरण खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सरकारने सद्या डीजिटलायझेशनला महत्व देत सर्व 7/12 ऑनलाईन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सर्व प्रक्रिया देखील पुर्ण करुन अद्यावत 7/12 तयार करण्यात आले आहेत. ऑन लाईन 7/12 केल्या मुळे शेतकऱ्याला 7/12 केव्हाही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्याला पायपीट करण्याची गरत नाही. तसेच 7/12 ऑनलाईन असल्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा घोर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या नवीन यंत्रणेचा लाभ घेऊन ऑनलाईन अद्यावत 7/12 तपासून घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केले आहे. यावेळी सदर गावातील काही अडचणी ग्रामस्थांनी आमदार साहेबांसमोर मांडल्या त्यांचे तात्काळ निरसन करण्याबाबत आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी तहसीलदार यांना सूचना करण्यात आल्या.


मौज् विहीगांव, रामनगर या गावातील योगेश बेलोकार, धर्मनाथ वाडोकार, श्रीकृष्ण वाडोकार, एकनाथ वाडोकार, वासुदेव भिसे, सखाराम महाले, मोतीलाल शेंगोकार, प्रल्हाद बदरखे, वासुदेव मानमोडे श्रीकृष्ण महाले यांना प्रायोगिक तत्वावर डीजिटल 7/12 चे वाटप करण्यात आले. यावेळी श्री पाटोळे तहसीलदार खामगाव श्री कुलकर्णी मंडळ अधिकारी तलाठी सरपंच यांचेसह गावकरी विहिगाव व रामनगर मोठया संख्येने उपस्थित होते.