जळगाव जामोद नांदुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद…
पुर्ण नदिच्या पुलावरून वाहतय पाणी…
जळगाव जा:-( सागर झनके ) बुलढाणा जिल्यासह पुर्व विदर्भातील अकोला,अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने लहान मोठे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.तर लहान मोठे धरण ही पुर्ण क्षमतेने भरलेले असून त्यामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने मानेगाव लगत असलेला पुर्णा नदीवरील ब्रिटिश कालीन पुल पुर्णा पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे वाहतूक पुर्णतः बंद करण्यात आली आहे.
याअगोदरही बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने ८ सप्टेंबर पुर्णा नदीला पुर येवून जळगाव जामोद – नांदुरा मार्ग वाहतुकिसाठी बंद झाला होता. जिल्ह्यात अधुन-मधून सतत पावसाच जोर वाढतच असून छोटे मोठे प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरलेले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर आला आहे.त्यामुळे पुर्णा नदीला पूर येवून मानेगाव लगत असलेल्या पुर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे.सद्ध्या नदीवरून एक फुट पाणी वाहत असून जळगाव जामोद-नांदुरा मार्ग वाहतुकीसाठी पुर्णतः बंद करण्यात आला आहे.नदीच्या पात्र दुथडी भरून वाहत असून पुराच्या पाण्यामध्ये वाढ होत आहे.नदीच्या पाण्यामध्ये पाण्याचा विसर्ग असच होत राहीला तर मोठा पुर होवू शकतो.पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल असून कुठलाही अनुचीत प्रकार घडू याकडे लक्ष देवून आहे.