Home आंदोलन रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी  लाक्षणिक उपोषण

रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी  लाक्षणिक उपोषण

 

संग्रामपूर : ग्रामपंचायत रोज ग्राम रोजगार सेवकांना सेवेत कायम करा यासह विविध मागण्यांसाठी संग्रामपूर तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी तहसील कार्यालयासमोर 2 ऑक्टोंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की राज्यामध्ये सन 2006 पासून आजपर्यंत राज्यात 28 हजार 144 रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या निधीतून सव्वा दोन टक्के चारटक्के व 6टक्के मानधनावर कार्यरत असून सन 2006 पासून गेल्या पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर रोजगार सेवक म्हणून काम करतात पण प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पॅनल च्या माध्यमातून नवीन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची निवड होते पण राज्यांमध्ये बऱ्याच ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाल्यावर सूडबुद्धीने ग्राम रोजगार सेवकावर खोट्या प्रोसिडिंग द्वारे कामावर कमी करून जाणीवपूर्वक अन्याय केला जातो त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो व त्यांच्या कुटुंबीयांची पालनपोषणाची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून रोजगार सेवकावर असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते त्यामुळे राज्यातील एकूण 28 हजार 144 ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक यांना ग्रामपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करून न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे सदर निवेदनावर महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघटना संग्रामपूर तालुक्याचे अध्यक्ष विनोद उमरकर देविदास शिंदे ,संतोष वानखडे ,बाळकृष्ण बोदळे, वासुदेव गवई ,अर्जुन ढगे ,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत