Home कोरोना अपडेट्स वा, क्या बात ! डॉ . निलेश टापरे यांनी कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना...

वा, क्या बात ! डॉ . निलेश टापरे यांनी कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘अशा’ शब्दांत दिला निरोप !

खामगाव : “तुम्ही सर्वांनी मानवतेची मोठी सेवा केली होती, तुम्ही सगळे खरे योद्धा आहात “अश्या भावनिक शब्दांत खामगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलेश टापरे यांनी कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना निरोप दिला.या कर्मचाऱ्यांनी सुद्धा टीम लीडर म्हणून डॉ  टापरे यांच्या प्रती आदर व्यक्त केला.

 

कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना
निरोप देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे  याांच्या सोबतच  सर्व सहकारी भावनिक झाले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेले डॉक्टर, नर्स वॉर्डबॉय, सफाई कामगार यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. खामगाव सामान्य रुग्णालयात जवळपास 52 कोविड कंत्राटी कर्मचारी रुग्णांच्या सेवेत होते.तज्ञ डॉक्टरांचा मार्गदर्शनाखाली हे कर्मचारी रुग्णांची देखभाल औषधोपचार साफसफाईही सारी कामे करत. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा धोका आणि नागरिकांमध्ये असलेली भीती लक्षात घेता या सेवेसाठी तयार होणे म्हणजे मोठे धाडसाचे काम होते. तरीसुद्धा रुग्णांसाठी कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. खऱ्या अर्थाने हे सर्वजण होईल मानवतेचे पुजारी आहेत.
आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सरकारने कोविड कंत्राटी कर्मचार्‍यांना कार्यमुक्त केले आहे. खामगाव येथे सुद्धा कर्मचारी कार्यमुक्त झाले आहेत, मात्र सोबत काम करत असताना डॉक्टर नर्स अन्न कर्मचाऱ्यांचे ऋणानुबंध जुळले होते. त्यांना निरोप देताना निश्चितच मनात थोडी हुरहूर होती असे डॉ निलेश टापरे यांनी सांगितले .सोशल मीडियावर तशी पोस्ट सुद्धा शेअर केली आहे टीम लीडर असावा ये यातून स्पष्ट होते.

डॉ निलेश टापरे यांची पोस्ट

“सर्व कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आज शेवटचा दिवस आहे, तुम्ही सर्वांनी मानवतेची मोठी सेवा केली होती, तुम्ही सगळे खरे योद्धा आहात. तुमच्या सर्वांना तुमच्या भावी आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा”! (Today is the last day for all covid contractual staff , you all had done great service to humanity , you all are real warrior . My Best wishes to all of you for your future life )