Home धर्म जागरण जय गजानन ! गुरुवारी मंदिरे उघडणार!

जय गजानन ! गुरुवारी मंदिरे उघडणार!

 

बुलढाणा: गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत दिलासा दिला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी राममूर्ती यांनी आदेश काढला.त्यानुसार सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत.

उघड दार देवा, अशी विनवणी सुरू असताना आणि कोरोना काळा विरोधकांचे आंदोलन सुरू असताना, मंदिर उघडण्याचा निर्णय लांबणीवर गेला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याने मंदिर उघडणार आहेत.
यासंदर्भात जिल्हा प्रशासन म्हणते की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली होणार असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे कळकळीचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here