Home निवड - नियुक्ती महाराष्ट्र धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्षपदी मनोहरराव पाचपोर

महाराष्ट्र धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्षपदी मनोहरराव पाचपोर

 

शेगाव :महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष पदी मनोहरराव पाचपोर यांची निवड करण्यात आली आहे.
स्थानिक विश्रामभवनमध्ये महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष चिमणराव डांगे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक पार पडली.यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे,शरद वसतकार,डाॅ अल्काताई गोडे,बबनराव रानगे,सुनिल वाघ,अरूण मखमले,भारत वाघ,अशोकराव देवकते,अंकुश निर्मळ,सौ चंदाताई पुंडे आदी सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे यांनी सुचवल्यानुसार प्रदेशाध्यक्ष चिमणराव डांगे यांनी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदी मनोहरराव पाचपोर आडोळ यांची निवड केली.
धनगर समाज एकसंघ करून प्रत्येक कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी शासकीय सोयी सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी महासंघ कटीबध्द असल्याची ग्वाही नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनोहरराव पाचपोर यांनी दिली.तसेच आरक्षणासाठी जिल्ह्यात लढा उभारण्यात असल्याचे सांगून समाज बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.