Home Breaking News ‘अनाथ’ आरक्षणाचा लाभ ;नारायण इंगळे पहिला अधिकारी ;मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले...

‘अनाथ’ आरक्षणाचा लाभ ;नारायण इंगळे पहिला अधिकारी ;मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले कौतूक

 

मुंबई – राज्यसेवा आयोगाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत अनाथ आरक्षणाचा लाभ मिळाल्याने नारायण इंगळे या तरुणाला प्रादेशिक वन अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. अनाथ आरक्षणातून झालेला नारायण हा पहिला अधिकारी असून त्याला शुभेच्छा देत त्याचे मी खूप खूप अभिनंदन करते अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

अनाथ बालकांसाठी नोकरी, शिक्षणात एक टक्का आरक्षण ठेवण्यात यावा यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने सातत्याने पाठपुरावा करून आरक्षण मिळवले होते.

आरक्षणाचा लाभ मिळाल्याने नारायण इंगळे या तरुणाला नुकत्याच झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रादेशिक वन अधिकारी म्हणून रुजू होता येणार आहे. याबाबत नारायणशी दूरध्वनीवरून संपर्क साधत श्रीमती ठाकूर यांनी शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही आपण कायम सोबत असल्याची ग्वाही त्यांनी नारायण याला दिली. यापुढे होतकरू अनाथ बालकांना आरक्षणाचा लाभ मिळेल आणि त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होईल असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. तर नारायण इंगळे यांनी अनाथ आरक्षणाचा लाभ मिळाल्याबद्दल महिला बालविकास विभाग आणि मंत्री यशोमती ठाकूर यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले कौतूक

पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here