Home Breaking News नराधमांना कठोर शिक्षा व्हावी – ॲड.जयश्री शेळके

नराधमांना कठोर शिक्षा व्हावी – ॲड.जयश्री शेळके

 

 

नांद्राकोळी अत्याचार प्रकरण

 

बुलडाणा : तालुक्यातील नांद्राकोळी येथील चुलत बहिणीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव तथा जि. प. सदस्य ॲड.जयश्री शेळके यांनी 30 सप्टेंबर रोजी पोलीस अधिक्षकांकडे केली.

 

संकटकाळात बहिणीचे रक्षण करावे हेच एका भावाचे कर्तव्य असते. परंतु राष्ट्रमाता जिजाऊंचे माहेरघर असलेल्या आपल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यामध्ये बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आयुष्यभर रक्षण करण्याची शपथ घेणारा भाऊच एका बहिणीसाठी भक्षक ठरला आहे. नांद्राकोळी येथे चुलत भावानेच बहिणीवर अत्याचार केल्याच्या घटनेने जनमानसात संतापाची लाट आहे. अत्याचार केलेल्या दोन्ही आरोपींना पोलीस प्रशासनाने अटक केलीच आहे. मात्र या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देऊन या घटनेचा तपास करावा, अशी मागणी ॲड.जयश्री शेळके यांनी केली आहे.