Home पाऊस अपडेट पाऊस थांबणार! असा आहे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास!!

पाऊस थांबणार! असा आहे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास!!

 

खामगाव – परतीच्या मान्सूनविषयी हवामान विभाग दिल्लीचे तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारतातील काही भागांतून येत्या ६ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. यामुळे होणाऱ्या परतीच्या पावसाविषयी चार आठवड्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आहे.

यावर्षी राज्यभरात जोराचा पाऊस बरसला आहे पावसामुळे सर्वात जल प्रकल्प तुडुंब भरले आहेत अनेक ठिकाणी पिकांची मोठी हानी सुद्धा झालेली आहे दरम्यान आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशाच्या पश्चिम, वायव्य आणि या भागांच्या आजूबाजूच्या मध्य भारतातील बहुतेक प्रदेशांमध्ये सर्वसाधारण प्रमाणाहून अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुसऱ्या आठवड्यात देशाच्या मध्य भागातील राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण सर्वसाधारण प्रमाणाहून जास्त राहील. तर, वायव्य भागात हे प्रमाण सर्वसाधारण असेल.


तिसऱ्या आठवड्यात देशाच्या पूर्व भागात पाऊस सुरू राहील. तर चौथ्या आठवड्यात देशातील बहुतेक ठिकाणचा पाऊस सर्वसाधारण प्रमाणाहून कमी झालेला असेल. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पाऊस थांबणार असल्याने पिकांची नासाडी कमी होईल असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जात आहे दरम्यान पावसाने राज्यभरात पिकांची मोठी हानी झाली असून सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरत आहे.

पंजाब डख  यांचा असा अंदाज

उद्या 2 ऑकटोबर पासून परतीच्या पावसाला सुरवात होइल . दसरा पर्यंत पाउस निघूण जाण्याच्या तयारीत

जर वातावरणात अचानक बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

जाताना वरुण राजाची बॅटींग

सातारा, सोलापूर, सांगली उस्मानाबाद लातूर व कोकनपट्टी या भागाला जाता जाता झोडपूण काढणार आहे.

माहीतीस्तव- राज्यात परतीचा शेवटचा पाउस पडेल पण खूप जोरदार नसेल . पाउस लवकर जाण्याच्या तयारीत आहे व दसरा मध्ये थंडीला सुरवात होण्याचे योग आहेत व पाउस निघूण लवकर गेला तर थोड फार सोयाबिन शेतकर्यांच्या पदरात पडेल महणून पाउस लवकर निघूण जाणे हे फायद्याचे आहे.

शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.

पंजाब डख
हवामान अभ्यासक

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here