Home Breaking News मॉर्निंग वॉक जिवावर बेतला ; 2 ठार, 1जण गंभीर!

मॉर्निंग वॉक जिवावर बेतला ; 2 ठार, 1जण गंभीर!

 

बुलडाणा : मॉर्निंग वॉक करताना आतापर्यंत अनेकांचा बळी गेला. कोरोना काळात मॉर्निंग वॉक बंद असल्यावरही नियमांना बगल देत हा प्रकार सुरू होता. आजही
मोताळा पोलीस स्टेशन बोराखेडी हद्दीत मलकापूर रोडवर डिडोळा फाट्याजवळ 2 ठार तर 1जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

डिडोळा येथील अमोल निनाजी गाडे वय 20 वर्ष कमलेश निनाजी जुनारे वय 20 वर्ष दिपक रामनाथ कायस्थ वय 45 वर्ष नगरपंचायत मोताळा वॉटर सप्लाय कर्मचारी देऊळगाव राजा हे तिघे रोडवर कडेला व्यायाम करीत असताना त्यांना अज्ञात वाहनाने उडवून दिले आहे.त्यामध्ये अमोल निनाजी काळे,दिपक रामनाथ कायस्थ असे मृतकाचे नाव आहे.
मलकापूर येथील सरकारी रुग्णालयात व कमलेश शिवाजी जुनारे याला बुलढाणा सरकारी दवाखान्यातून औरंगाबाद येथे रेफर केले असल्याचे समजले. अपघाताची माहिती समजताच बोराखेडी पोलिस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here