Home शेगाव विशेष ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानास शेगाव नगरपरिषदेची तिलांजली !

‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानास शेगाव नगरपरिषदेची तिलांजली !

प्रभाग 10 मधील नागरिकांचे विविध समस्या साठी नगर परिषद ला निवेदन

शेगाव प्रतिनिधी : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष अन्सार खान महबूब खान यांनी प्रभाग 10 मधील विविध समस्या साठी शेगाव नगर परिषद निवेदन दिले आपल्या नगरपरिषद तसेच शेगाव शहर हे स्वच्छ भारत मिशन मध्ये पुरस्कार मिळाला असून अद्याप पर्यंत लाभार्थ्यांचे स्वच्छालय अनुदान तसेच त्यांच्या फाईल ह्या आपल्या कार्यालयात धूळखात पडलेले आहेत तसेच मागील दोन ते तीन वर्षापासून लाभार्थ्यांना निधी वितरित झालेल्या नाहीत त्यामुळे हे लोक उघड्यावर शौचालय जातात म्हणून आपल्या शहरात घाणीचे साम्राज्य होण्यास वेळ लागणार नाही.
सदर स्वच्छालय निधी लवकरात लवकर वितरित करण्यात यावा याकरिता प्रभागांमधील नागरिकांनी नगरपरिषदेला आज निवेदन दिले या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक शेगाव शहर अध्यक्ष अन्सार खान राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे शेख बिस्मिल्ला असलम खान अन्सार शहा जुबेर शहा शेख साबीर फिरोज खान बिस्मिल्ला खान, लुकमान शहा आदी नागरिकांच्या स्वाक्षरा आहेत
तरी नगर परिषदेला विनम्र निवेदन आहे की लवकरात लवकर स्वच्छालय अनुदान च्या फाईल पुढे सरकून सदर लाभार्थ्यांना निधी वितरित करावा
स्वच्छ भारत मिशन चा कोट्यावधी रुपयाचा पुरस्कार सदर शेगाव नगरपरिषद त्याला मिळाला आहे मात्र शहरातील नागरिक स्वच्छालय अभावी उघड्यावर स्वच्छालय जातात लाभार्थ्यांच्या शौचालय निधी अजूनही वितरित करण्यात आला नाही त्यामुळे स्वच्छ भारत मिशन या अभियानास या पुरस्कारात शेगाव नगरपरिषदेने तिलांजली दिली आहे सदर स्वच्छालय निधि येत्या एका महिन्यात लाभार्थ्यांना वितरित केला गेला नाही तर राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहर च्या वतीने लोकशाही मार्गाने नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन व अतिशय तीव्र व तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुकारण्यात येईल.

अन्सार खान मेहबूब खान

शेगाव शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल