Home लेख बारामती डिजिटल! अम्ब्रेला ऍप नव्या डिजीटल युगाची सुरूवात!!

बारामती डिजिटल! अम्ब्रेला ऍप नव्या डिजीटल युगाची सुरूवात!!

 

बारामती देशातली पहिली अ वर्ग नगरपरिषद बनणार अशा बातम्यांनंतर सर्वांच्याच उत्सुकता ताणल्या गेल्या. अम्ब्रेला ॲपचं लाँचींग होणार म्हणजे नेमकं काय होणार आहे, असा प्रश्न अनेकांना पडला. तर हे अम्ब्रेला ॲप म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि यामुळे बारामतीकरांचं जीवन कसं सुखकर होणार आहे यावर प्रकाश टाकणारा हा लेख…

अम्ब्रेला ऍप ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना असून प्रत्येक कामासाठी नागरिकांना आता वेगवेगळे मोबाईल ऍप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून ‘डिजिटल अम्ब्रेला ऍप’ विकसीत करण्यात आलं आहे. देशात पहिल्यांदाच अ वर्ग नगरपरिषदेमध्ये अशा प्रकराचं ॲप विकसित होत आहे. अम्ब्रेला ऍप हे नागरिकांच्या विविध गरजेच्या ॲपचा एक संग्रह आहे. यामध्ये साईन इन केल्यानंतर सर्वच ॲप साठी वन टच लॉग-ईन असून एकदाच रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.


अशा प्रकारचे एक ॲप असावे जिथे सर्व सुविधा एका क्लिक वर मिळतील अशी संकल्पना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडल्यानंतर तात्काळ ICICI Foundation ने या ॲपसाठी निधी देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर वेगाने चक्रं फिरली आणि कौस्तुभ बुटाला यांच्या मार्गदर्शनाखाली या ॲपची निर्मिती आणि अंमलबजावणी अत्यंत कमी वेळात उन्नती डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे.
वापरायला अत्यंत सोपं असलं तरी या तांत्रिकदृष्ट्‍या हे अत्यंत किचकट काम होतं. विविध ॲप मध्ये समन्वय राखणं, नागरिकांनी केवळ ऑनलाइनच नाही तर ऑफलाइन प्रतिसादही मिळावा म्हणून नियंत्रण कक्षाची उभारणी आणि रचना करणे इत्यादी कठीण गोष्टी समोर होत्या. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकदा मनावर घेतलं की ते कुणाचंही ऐकत नाहीत, तसंच या ही वेळेला झाले. अजित पवारांनी कौस्तुभ बुटाला यांना या सर्व सेटअप ची जबाबदारी सोपवली आणि काम सुरू झाले. आज या ॲप वरून विविध बँका, विमा कंपन्या, आपत्कालीन सेवा, नागरी सुविधा यांचा एका क्लिक वर लाभ घेता येऊ शकतो.

या अम्ब्रेला ॲपमध्ये वेगवेगळं तंत्रज्ञान वापरून तयार केलेली अनेक स्थानिक, शासकीय प्रशासन आणि नागरिक-केंद्री ॲप्लिकेशन्स आहेत. या सगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये समन्वय साधण्याचं काम अम्ब्रेला ॲप करतं. टेलीमेडिसिन, क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन, जीआयएस टॅगिंग, संपत्ती व्यवस्थापन सोल्यूशन्स, तक्रार निवारण प्रणाली, आपत्त्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी नागरिक-केंद्री फेज 1 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

आपण आता या Application ची वैशिष्टे पाहुया…
टेलीमेडिसिन ॲप :
टेलीमेडिसिन ॲप हे बारामती नगर परिषदेच्या नागरिकासांठी उपलब्ध असेल. टेलिमेडिसिन सेवेव्दारा महाराष्ट्राच्या दुर्गम आणि दूरच्या भागातसुध्दा दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात येऊ शकते. यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाते. डॉक्टरांचा सल्ला, दूरध्वनी व व्हिडिओ संभाषण आणि ध्वनी संभाषण करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. या App द्वारे प्रत्येक रूग्णाची नोंदणी होते. रुग्णासंबंधी सर्व आवश्यक माहिती एकत्रित करुन त्याचा अहवाल आरोग्य खात्याला सोपवला जाऊ शकतो. असा अहवाल राज्य सरकारांकडून सुधारित आरोग्य सेवा नियोजनासाठी वापरला जाऊ शकतो. लक्षणे, निदान, वैद्यकीय सल्ला, औषधांचा वापर, रूग्णाच्या आरोग्याबाबतच्या माहितीचे विश्लेषण या प्रणालीद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे केले जाऊ शकते. बारामतीकरांना आता या सर्व सुविधा घरबसल्या मिळणार आहेत. बारामतीकरांसाठी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचं पॅनेल तयार करण्यात आलं असून दवाखान्यात न जाता ही प्राथमिक वैद्यकीय तपासणीची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत. कोविडसदृश्य लक्षणे तसंच लहान-सहान आजारांबाबत रूग्णांना तात्काळ वैद्यकीय सल्ला मिळाल्याने आरोग्य सेवेवरचा ताण ही बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे.

माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विनंतीवरून येणाऱ्या काळात हेल्थ किऑस्क प्रणाली बारामतीतील विविध हॉस्पिटल्समध्ये देऊन ही प्रणाली टेलिमेडीसीन प्रणाली शी जोडण्याचा ICICI फाऊंडेशनचा मानस आहे.

हेल्थ किऑस्क प्रणालीवर ५२ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झटपट पद्धतीने करण्यात येतात. अशा प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करायला सामान्यत: ग्रामीण भागातील लोकांना शहरात जाऊन वेळ-काळ खर्च करावा लागतो.

अशा चाचण्यांची सुविधा जर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उपलब्ध झाली तर ती आरोग्य व्यवस्थेतील मोठी क्रांती असेल. या हेल्थ किऑस्कमध्ये ही टेलिमेडीसीनची सुविधा Integrate करून देण्यात आलेली आहे. अशा Integrate केलेल्या सुविधेद्वारे ज्या ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर जायला टाळाटाळ करतात. अशा ग्रामीण भागात सुद्धा सुलभतेने रिमोटली रुग्णांची तपासणी करता येईल.

या अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये कान तपासणे, नाक तपासणे, डोळे तपासणे, अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. त्यामुळं डॉक्टर हा कुठल्याही शहरातून या किऑस्कवर उभं असलेल्य रुग्णाच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करू शकतात. त्याचं निदान तिथल्या तिथं करू शकतात. हे virtual Patient inspection मधील क्रांतीच आहे. असे टेलिमेडीसीन किऑस्कसुद्धा आयसीआय फाउंडेशन येणाऱ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. आणि निश्चितच यामुळे बारामतीवरचा तसेच महाराष्ट्रातल्या वेगवगेळ्या भागातल्या आरोग्य सेवेवरचा ताण कमी होऊन लोकांना अत्यंत दर्जेदार सुविधा कमीत कमी किंमतीत उपलब्ध होईल.

क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन Application

मालमत्ता व्यवस्थापन कुठल्याही आस्थापनेच्या दृष्टीने महत्वाचे असते. सरकारी आस्थापनांना त्यांच्या मालमत्तेचे वेळोवेळी परिक्षण (ऑडिट) करून घ्यावे लागते. मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली हे एक ॲप आहे जे वापरकर्त्यांना त्यांच्या मालमत्तेचा संपूर्ण आढावा घेण्यास मदत करते. सध्या सरकारी मालमत्तेची अचूकपणे माहिती व संख्या पाहिजे असल्यास त्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करून ती माहिती संकलित करावी लागते.

तसेच physical audit verification म्हणजेच जागेवर मालमत्तेची प्रत्यक्ष तपासणी करण्याची अत्याधुनिक यंत्रणा बहुतांश ठिकाणी नाही. त्यामुळे मालमत्तेच्या गळतीचा धोका संभावतो. ह्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन हे Application तयार करण्यात आलं आहे.

• वाहने, कपाटं, संगणक, पंखे अशा कुठल्याही प्रकारच्या चलीत अचलित मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी हे Application वापरले जाऊ शकते. एखादी मालमत्ता संपादन करण्यापासून तिची देखभाल, हस्तांतरण, आणि मालमत्तेचे आयुष्य संपल्यावर तिची विल्हेवाट तसेच नवीन मालमत्ता संपादन करण्यापर्यंतची पूर्ण माहिती या app मध्ये साठवता येते.

या ऍप चा वापर करण्याआधी सर्व प्रकारच्या मालमत्तांवर वेगवेगळा क्यू आर कोड छापून लावला जातो. या प्रणालीमध्ये बारकोड आणि क्यूआर कोड स्कॅनिंग सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेद्वारे मालमत्ता सर्वेक्षण करणारा सहजपणे त्यांच्या मोबाईल फोन वरून क्यूआर कोड स्कॅन करून तपशीलवार माहिती मिळवू शकतो.

• ऑडिटच्या वेळेस ज्या मोबाईल मधून क्यू आर कोड स्कॅन केला जात आहे त्याचे जी पी एस कोओर्डिनेट्स आणि मालमत्तेचे जीपीएस कोओर्डिनेट्सच्या मदतीने सदरची मालमत्ता नियोजित ठिकाणी आहे की नाही यासंबंधीची पडताळणी करता येते. हे फिचर दुसऱ्या टप्प्यात सुरु करण्यात येणार आहे.

• या ॲपमध्ये वापर करणाऱ्याच्या गरजेनुसार आणि अधिकारानुसार माहिती बाळगण्याचा आणि त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार देण्यात येतो. त्यामुळे ज्यांना जी माहिती बघणे गरजेचे आहे. तीच माहिती त्यांना उपलब्ध होते. हे मोबाईल ॲप आस्थापनेच्या इतर सॉफ्टवेअर बरोबर जोडले जाऊ शकते.

• मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी किंवा यासंबंधीच्या सेवा हमी (सर्व्हिस वॉरंटी) चे नियमन आणि नियोजन करण्यासाठी म्हणजेच preventive maintenance तसंच corrective maintenance करण्यासाठी या प्रणालीचा प्रभावीपणे करता येऊ शकतो.

मालमत्तेच्या व्यवस्थापनेसाठी सहज सुलभ व अत्यंत प्रभावी क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन application मुळे नक्कीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वाढवून सरकारी मालमत्तेची गळती थांबेल.

जीआयएस टॅगिंग: कार्य ट्रॅकिंग आणि देखरेख प्रणाली
जीआयएस आधारित टॅगिंग आणि ट्रॅकिंग application हे मनुष्यबळाच्या योग्य वापरासाठी आणि त्यांच्यांवर देखरेख ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हे ॲप जीपीएस प्रणालीचा वापर करीत असल्यामुळे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ते नियंत्रण ठेवता येते.

• या ऍप च्या माध्यमातून कर्मचार्यांना त्यांच्याशी संबंधित कामाचे हस्तांतरण करता येते (टास्क अलोकेशन) एकदा एखादे काम सदर कर्मचाऱ्याला हस्तांतरित केले की, त्या कामाचे अवलोकन करता येते. ठराविक वेळेमध्ये त्या कर्मचाऱ्याने काम न केल्यास त्याच्या वरीष्ठांना तशी सूचना देता येते.

• यामध्ये शेड्यूल टास्क रिपोर्टिंग, चेकलिस्ट सारख्या महत्त्वाच्या सुविधा आहेत. शेड्यूल टास्क रिपोर्टिंग म्हणजे ठराविक वेळी आणि ठराविक दिवशी करायची काम याचा तपशील आणि चेकलिस्ट म्हणजे दिलेल्या कामाच्या प्रत्येक टप्प्यावर काम पूर्ण झाल्याची नोंद. तसंच या ॲपमध्ये माहिती मिळवण्यासाठी आवश्यक फॉर्म, कॅलेंडरमधील टास्क शेड्यूलर यासारख्या सोयींचा समावेश करण्यात आला आहे.

 

मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून तारीख, वेळेची नोंद असलेला आणि जीपीएस टॅग असलेला फोटो फिल्डवरून अपलोड करण्याची सोय या ॲपमध्ये आहे.

• या ॲपमध्ये संबंधित कर्मचारी ज्या विभागामध्ये कार्यरत आहे. त्याचा नकाशा निश्चित करून त्याची हद्द आखून दिली जाते आणि नेमून दिलेले काम या हद्दीमध्ये होत आहे की नाही याची नोंद हे ॲप ठेवते.

• हे ॲप वापरणारा कर्मचारी त्याच्या कार्यालयीन वेळेत निर्धारित हद्दीमध्ये उपलब्ध आहे की नाही याची नोंद हे ॲप वेळोवेळी करते आणि नोंदीची सांगड कर्मचाऱ्यांच्या हजेरीपत्रकाशी लावता येऊ शकते.

या अॅप्लिकेशनचे डॅशबोर्ड विविध प्रकारची माहिती अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देतात. यामध्ये विभागवार किंवा वॉर्डवार उपलब्ध असलेले कर्मचारी त्यांना नेमून दिलेली कामे, त्यांची पुर्तता, अपुरी राहिलेली कामे असा एकत्रित आढावा सतत अपडेट होणाऱ्या डॅशबोर्डच्या माध्यमातून घेता येतो.

फिनएक्सा: संपत्ती व्यवस्थापन Application

अनेक नागरिकांना पैश्याचं नियोजन कसं करावं असा प्रश्न नेहमी पडतो… या प्रश्नाचं उत्तर ‘फिनएक्सा application द्वारे नागरिकांना मिळणार आहे. या app द्वारे नागरिकांकडे असलेल्या पैश्यांचं व्यवस्थापन कसं करावं? यांचं मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. संपूर्ण घरासाठी एक विस्तृत स्वतः नियोजित केलेली आर्थिक योजना, सध्याचा वित्तीय आढावा, उत्पन्न, खर्च, कर्ज, गुंतवणुकीसंबंधी माहिती, आकस्मिक खर्चाचे नियोजन, आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचे आर्थिक नियोजन, निवृत्तीची योजना, विमा योजना, गुंतवणुकीमधील जोखीमेचे विवरण आणि व्यवस्थापन, यासारख्या सुविधा या ॲपमध्ये देण्यात आल्या आहेत.

– फिनेक्सा या App मध्ये आपले संपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञ व्यक्तीची गरज लागत नाही. नागरिक त्यांच्या उत्पादनसंबंधी व लक्ष्यांसंबंधी माहिती भरल्यास हे app त्यांना मार्गदर्शन करते.

– या App मध्ये नागरिक त्यांची आर्थिक माहिती देत असल्यामुळे या माहितीच्या सुरक्षिततेसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य, SSL सर्टिफिकेशन डाटा इन्क्रिप्शन केले गेले आहे.

– झटपट आर्थिक नियोजन तयार आणि पीडीएफ, वर्ड मध्ये डाऊनलोड करता येते.

– या app मुळे बारामतीकरांना चांगल्या पद्धतीने स्वत:चे आर्थिक नियोजन करता येईल. त्यामुळे त्यांच्या happiness Index मध्ये नक्कीच वाढ होईल.

लोकऑफ application

बारामती डिजिटल अम्ब्रेला ॲपमध्ये असलेल्या लोकऑफ फिचरमध्ये स्थानिक व्यावसायिकांना आपल्या मालाची जाहिरात करून विकण्याची तसेच नागरिकांना घरबसल्या खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

– लोकऑफ या मोबाईल App चा दोन प्रकारे वापर करता येऊ शकतो. दुकानदार ते ग्राहक आणि उत्पादक ते दुकानदार, अशा प्रकारे खरेदी विक्री केली जाऊ शकते. दुकानदार त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तुंची खरेदी थेट उत्पादकांकडून करू शकतो. या प्रक्रियेमुळे कमिशन एजंटचे कमिशन द्यावे लागत नसल्याने दुकानदारांना मिळणाऱ्या नफ्याबरोबरच उत्पादकांनाही मोठा फायदा होतो.

– या ॲपच्या साहाय्याने व्यावसायिकांना केवळ 60 सेकंदात ऑनलाइन स्टोअर तयार करण्यासाठी, त्यांच्या उत्पादनासंबंधीची माहिती आणि विशेष ऑफर्स दर्शवण्यासाठी मदत करते. या व्यतिरिक्त, अशा प्रकारे तयार झालेली ऑनलाईन स्टोअर्स संबंधित व्यावसायिक त्यांच्या सोशल मीडिया द्वारे त्याच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात.

– ग्राहकांना या app चा वापर करून त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू सर्च पर्यायाच्या माध्यमातून शोधता येते.

– व्यावसायिकाच्या व्यवसायाच्या ठिकाणापासून पाच किलोमीटरच्या परीघामधील ग्राहकांपर्यंत ही माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून पोहोचवता येते.

– ग्राहकांना देखील वस्तू खरेदी करताना विविध दुकानदारांचा पर्याय उपलब्ध होतो.

– या app च्या माध्यमातून दुकानदारांना झालेल्या विक्री संबंधीचा डॅशबोर्ड उपलब्ध होतो.

pandemic च्या काळात असं Application लॉकडाऊनमध्ये नागरिक आणि दुकानदारांना वरदान ठरू शकते.

एसओएस- (वैयक्तिक आपत्कालीन बचाव) Application

एसओएस प्रणाली द्वारे व्यक्तीला अथवा एखाद्या कुटुंबाला अचानकपणे उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तात्काळ मदत करणं सोपं होणार आहे.

भूकंप, पूर परिस्थितीत, आग लागली आहे, दरड कोसळली, अपहरणाचा प्रयत्न, चोरी अथवा दरोडा, रस्ते अपघात, घरगुती अपघात, कौटुंबिक हिंसा, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती अशा घटनांमध्ये संबंधित मदत करणाऱ्या टीमला लवकरात लवकर आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचण्यासाठी हे ॲप उपयुक्त आहेच तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा हे ॲप अत्यंत उपयुक्त आहे.
– या ॲपमध्ये असणाऱ्या जीओ टॅगिंग मुळं पोलिस, अग्निशमन दल, NDRF, SDRF, Ambulance यांना आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचणे सहज शक्य होईल.

– अचानकपणे संकटात सापडलेल्या नागरिकांना त्यांच्या मोबाईल ॲपमधील एसओएस हे ॲप उघडून त्यातील लाल रंगाचे एसओएस बटन दाबायचे आहे. यानंतर जे संकट आले असेल त्याची निवड करायची आहे. नागरिकाने निवडलेल्या आपत्कालीन परिस्थिती प्रमाणे त्याची सूचना संबंधित नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचवली जाईल. त्याच वेळी नागरिकांच्या मोबाईल फोनचे जी पी एस लोकेशन आणि पंधरा सेकंदाचा परिस्थितीचा व्हिडीओ आणि ऑडिओ त्यांना नियंत्रण कक्षाला पाठवता येईल.

– उदभवलेल्या परिस्थितीची माहिती नजीकच्या यंत्रणेला आपोआप प्राप्त होईल आणि उपलब्ध असलेले पथक सदर नागरिकाला योग्य ती मदत पोहोचवण्यासाठी पाठविले जाईल. ॲप द्वारे दिलेल्या माहितीवर जर संबंधीत कक्षाने कारवाई केली नाही अथवा त्यात त्यांना काही अडचण असल्यास नियंत्रण कक्षामधून योग्य त्या पथकाला मदत पोहोचवण्यासाठी निर्देश दिले जातील.

– विशेष म्हणजे जोपर्यंत नागरिकाला मदत मिळत नाही तो पर्यंत ही घटना ट्रॅक केली जाईल आणि जेव्हा मदत पथक त्या ठिकाणी पोहोचेल तेव्हाच नागरिक आणि मदत पथक योग्य त्या पर्यायाचा वापर करून ऑल क्लीअरचा संदेश देऊन ॲप मध्ये अपडेट करतील.

– या साठी दोन नियंत्रण कक्ष देखील स्थापन केले जातील. यातील एक बारामती नगर परिषदेमध्ये आणि एक बारामती पोलीस ठाण्यामध्ये असेल. उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या वर्गीकरणाप्रमाणे त्या त्या नियंत्रण कक्षामध्ये संबंधित अलर्ट प्राप्त होईल आणि येथे उपलब्ध असलेले कर्मचारी यावर नियंत्रण ठेवतील.

– मिळालेल्या मदतीबद्दलचा अभिप्राय सुद्धा नागरिक नोंदवू शकतील.
या App मुळे बारामतीकरांच्या मनातील सुरक्षिततेच्या भावनेमध्ये वाढ होऊन त्यांचा happiness index वाढेल.

Grievance redressal system म्हणजेच नागरिकांसाठी तक्रार निवारण प्रणाली

नागरिकांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये विविध प्रकारच्या तक्रारींची ड्रॉपडाउनची यादी उपलब्ध आहे. नागरिकाला या यादीमधून योग्य त्या पर्यायाची निवड करायची आहे. तक्रार नोंदवताना नागरिक या तक्रारीसंबंधी फोटो अपलोड करू शकतात. अशी तक्रार प्राप्त झाल्यावर संबंधित नियंत्रण कक्षामधील कर्मचारी यासाठी संबंधित खात्यास सूचित करेल आणि अशाप्रकारचे एक टास्क कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या मोबाईल ॲपमध्ये निर्माण केले जाईल.

– नागरिकांनी तक्रार केल्यापासून त्या तक्रारींचे समाधानकारक निवारण होईपर्यंत या तक्रारींचे अवलोकन आणि नियंत्रण, नियंत्रण कक्षाद्वारे केले जाईल. ड्रॉपडाउन मेनूमधून फक्त तक्रार श्रेणीमधून नागरिकाला तक्रार नोंदवायची आहे. अशी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

– नियंत्रण कक्षामध्ये असलेल्या डॅशबोर्डच्या आधारे अधिकारी, तक्रारी आणि त्यांच्या निवारणासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेऊ शकतात. जर तक्रार निर्दिष्ट कालावधीत तक्रार सोडवण्यात आली नाही तर ती तक्रार आपोआप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवली जाऊ शकते.

 

– सामान्यतः नागरिकांना नेमका कोणत्या विभागाकडे तक्रार नोंदवायची आहे याची माहिती नसते. ही समस्या तक्रार निवारण प्रणालीद्वारे सोडवली आहे. विशिष्ट तक्रारीचे मॅपींग योग्य त्या खात्यामध्ये app द्वारे आपोआप केली जाऊ शकते. तसेच अधिकाऱ्यांना तक्रारीचे ठिकाण हे app च्या माध्यमातून काढलेल्या फोटो मुळे समजू शकते.

– तक्रारीच्या निराकरणाबद्दल नागरिक थेट अभिप्राय देऊ शकतात.

– या प्रणालीत नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यासाठी वेगवेगळे log in देण्यात आलेले आहेत. नागरिक प्रणाली ही सामान्य नागरिक तर टास्क प्रणाली प्रशासकीय यंत्रणांनी वापरायची आहे.

– नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर तात्काळ कार्यवाही होत असल्याने या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा मिळू शकते.

– तक्रारीचे निराकरण करण्यासाठी लागणाऱ्या एकूण वेळेचा मागोवा घेतला जाऊ शकतो.

– डॅशबोर्ड, सविस्तर अहवालामुळे सरकारी विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठपुरावा घेण्यास, समस्यांचे निराकरण करण्याचा प्राधान्य ठरवण्यासाठी नक्कीच मदत होईल.

या app मुळे नागरिकांचं समाधान वाढून त्यांच्या happiness Index मध्ये वाढ होईल.
तर असं असणार आहे डिजीटल बारामती ॲप. हा संपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी बारामतीच्या नगराध्यक्ष श्रीमती पूर्णिमा तावरे, नगरपालिकेचे सीओ महेश रोकडे, पुणे ग्रामिणचे अतिरिक्त एसपी श्री मिलिंद मोहीते, नगरसेवक श्री किरण गुजर यांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले. रेवमॅक्सचे संचालक नरेश चौधरी व उन्नती डिजीटल सोल्युशन्सचे मंदार जोशी यांनी विशेष मेहनत घेतली. या सर्वांच्या सहयोगाने बारामतीत एक नव्या डिजीटल युगाची सुरूवात होणार आहे.