Home बुलडाणा जिल्हा वृत्त वा, ‘राजे’! दर महिन्याला बुलडाणा ते मुंबईवारी पत्रकारांचे जाहीरात बिल देण्यास हात...

वा, ‘राजे’! दर महिन्याला बुलडाणा ते मुंबईवारी पत्रकारांचे जाहीरात बिल देण्यास हात भारी!

खामगाव – पत्रकारांना सध्या अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच राजकीय नेत्यांकडून आधी जाहिराती देऊन नंतर पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील अनेक पत्रकार कोंडीत सापडले आहेत. कोरोना काळात वर्तमानपत्रांनी अनेक पत्रकारांना नोकरीवरून कमी केले. त्यामुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता.
पत्रकारांना कोणताही पगार व मानधन दिल्या जात नाही. जाहिरात हे त्यांचे उत्पन्नाचे साधन असते मात्र आताच्या काळात लवकर जाहिराती मिळत नाहीत, मिळालीच तर त्याचे पैसे  वेळेवर दिल्या जात नाहीत. परिणामी पत्रकारांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. बुलढाणा येथील भारतीय जनता पक्षात आलेल्या एका राजकीय नेत्याचा जाहिरात देण्याबाबत हात भलताच भारी असून जाहिरात द्यायची नंतर मात्र सहा महिने, वर्षभर बिल द्यायचे नाही, असा प्रकार या नेत्याकडून सुरू आहे. नावासमोर ‘राजे’ लावल्या जात असले तरी मनाचा उदारपणा मात्र या माणसात नाही असे बोलले जात आहे. तर हे महोदय दर महिन्याला मुंबई वारी करतात मात्र पत्रकारांचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे जर पैसे द्यायचे नाही तर पत्रकारांना जाहिराती तरी का देतात असेही बोलले जात आहे. तूर्त एवढेच!