Home Breaking News ‘श्रीहरी’ची अजब लीला, विनापरवाना, निकृष्ठ पाईप प्लांट सुरू केला!

‘श्रीहरी’ची अजब लीला, विनापरवाना, निकृष्ठ पाईप प्लांट सुरू केला!

संग्रामपूर : बोडखा येथे विनापरवानगी सुरू असलेल्या एचडीपीई पाईपच्या याच प्लान्टवर HDPE PIPE चा कच्चा माल बोलावण्यात येतो नंतर याच ठिकाणी या कच्या मालाच्या HDPE PIPE वर बोडखा येथील प्लांट वर त्या कच्च्या मालाच्या पाइपला नेकेट म्हणजेच कपलरचे तोंड लावण्यात येतात याच ठिकाणी नॉन आय एस ओ एचडीपी पाईप तयार करण्यात येतो व त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील ठिबक स्पिंकलर विक्रेत्यांना तसेच बुलढाणा जिल्हा बाहेरील इतर जिल्ह्यात या पाइपचा पुरवठा संबंधित बोडखा येथील श्रीहरी ठाकरे करतो यामधून संबंधित पाईप विक्रेत्याने करोडो रुपयांची माया जमवली आहे याची चौकशी जर आयकर विभागाने केली तर यातून खूप मोठे घबाळ बाहेर निघू शकते.

तसेच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बोडखा गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या प्लांट वर नॉन आय एस ओ पाईपांना एका मशीन द्वारे कपलर जोडून येथे ठिबक स्पिंकलर चा पाईप बनविला जातो त्यानंतर बोडखा येथून एचडीपीई पाईप ला कपलर लावल्यानंतर या ठिकाणावरून बुलढाणा जिल्ह्यातील ठिबक स्पिंकलर विक्रेत्यांना बोडखा येथील पाईप विक्रेता ठाकरे हा ट्रक द्वारे पाईपचा पुरवठा करतो काही दिवसाआधी या पाईप विक्रेत्याकडे स्वतःचे चार चाकी दोन मालवाहक वाहन होते परंतु पाईप विक्रीचा व्यवसाय मोठा झाल्या कारणाने संबंधित पाईप विक्रेत्याने दुसऱ्या मोठमोठ्या वाहनाने येथून पाईप विक्रीचा सपाटा सुरू केला आहे

याच प्लांट वर दिवस-रात्र एचडीपीई पाईपला कपलर लावण्यात येते मात्र या प्लांट वर जो विद्युत पुरवठा सुरू आहे तो विद्युत पुरवठा घरच्या डी एल मीटर वरूनच असल्यामुळे महावितरण कंपनीला हा प्लांट चालक वर्षभरात लाखो रुपयांचा चुना लावत आहे मात्र या बाबीकडे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तसेच कर्मचारी आर्थिक देवाणघेवाणीतून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे त्यामुळे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित प्लांट वर जाऊन कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे

संबंधित प्लांट्स चालकावर जर कारवाई न झाल्यास तालुक्यातील नागरिक लवकरच या प्लांट चालकाविरुद्ध आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आला आहे.