Home Breaking News आरोग्य विभागाची परीक्षा आता या तारखेला!

आरोग्य विभागाची परीक्षा आता या तारखेला!

खामगाव : आरोग्य विभागातील भरती परीक्षेच्या तारखाची आज घोषणा केली जाणार आहे.

● परीक्षा घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाकडून खासगी कंपन्या निवडल्या जातात. या कंपन्या परिक्षेसाठीचं सगळं नियोजन करतात.
● राज्य शासन फक्त पेपर काढण्याचं काम करतं. सध्या परिक्षेचे पेपर छापून तयार आहेत. या परिक्षेसाठी निवडलेल्या कंपनीने बरीचशी कामं केली आहेत.
● मात्र, जी वेळेत करायला हवीत ती केलेली नाहीत. सातत्याने पाठपुरावा आरोग्य विभाग केला. मात्र, काही गोष्टी त्यातून राहून गेल्या.
● केंद्र तयार करण्यासंदर्भातली काही कामं राहून गेल्याचं आमच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर ही कामं पूर्ण करण्यासाठी या कंपनीने अजून आठ दिवसांचा अवधी मागितला आहे.
● त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा नक्कीच होणार आहे.

 

 

👍 या बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य विभागाचे आयुक्त आणि संबंधित अधिकारी असणार आहेत. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

🧐 परीक्षा ऐन वेळी शुक्रवारी रात्री उशिरा स्थगित झाल्याने परीक्षा देण्यासाठी अगोदर केंद्रांवर पोहोचलेल्या परीक्षार्थींची मोठी गैरसोय झाली होती.

🗓️ राजेश टोपे म्हणाले, ऑक्टोबरच्या १५, १६ किंवा २२, २३ तारखेला परीक्षा होऊ शकते. जर १५ ची जी रेल्वेची परीक्षा आहे, ती जर पुढे ढकलता आली, तर १५, १६ परीक्षा होईल. अन्यथा २२, २३ तारखेला परीक्षा घेतली जाईल, अशी शक्यता आहे.