Home खामगाव तालुका दुर्बल महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळावी :अमोल बिचारे पाटील

दुर्बल महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळावी :अमोल बिचारे पाटील

अमोल बिचारे पाटील यांचे संसदरत्न सौ. खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवेदन

खामगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खामगांवच्या वतीने आर्थिक दुर्बल निराधार महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळावी यासाठी दि. २५.९.२०२१ रोजी बुलडाणा येथील कार्यक्रमात खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी बुलडाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुलडाणा येथील राष्ट्रवादी भवन येथे निष्ठावंत शिलेदारांचा सन्मान हा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमास खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे आल्या असत्या त्याठिकाणी पालकमंत्री नामदार डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब, खासदार रोहीणीताई खडसे तसेच जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी व महिला जिल्हा अध्यक्षा सौ. अनुजाताई सावळे तसेच जिल्हा सचिव अमोल वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी वाढलेली महागाई लक्षात घेत दुर्बल व निराधार महिलांना दरमहा आर्थिक मानधन मिळणे गरजेचे आहे, सततच्या वाढत असलेल्या महागाईमुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ मध्ये नविन योजनांचा समावेश करण्यात यावा जेणेकरुन उपेक्षित घटकाला न्याय मिळून आर्थिक दुर्बल निराधार यांच्या कुटूंबाचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्टीने सशक्त होण्याकरीता न्यायोचित आदेश देण्याबाबत वरील निवेदन संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना देण्यात आले.
तरी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जिल्हा सचिव अमोल बिचारे पाटील यांचेकडून निवेदन स्विकारत लवकरच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन न्यायोचित कारवाई करुन निर्णय घेण्यात येतील असे सांगीतले. यावेळी प्रदेश प्रतिनिधी गोतमारे सर, देवेंद्र देशमुख, अमोल बिचारे पाटील, दिलीप पाटील, महिला अध्यक्षा सौ. सुधाताई भिसे, मंगलाताई सपकाळ, तालुका अध्यक्ष भगवाान लाहुडकार, सैय्यद मोहीउद्दीन, विजय कुकरेजा, मिर्झा अक्रम बेग, विजय चोपडे, जयराम माळशिकारे, आनंद तायडे, सैय्यद सुलतान यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.