Home Breaking News विनापरवानगी टाकला,एचडीपीई पाईपचा प्लांट!

विनापरवानगी टाकला,एचडीपीई पाईपचा प्लांट!

संग्रामपूर : दोन वर्षापासून बोडखा गावातील ठाकरे नामक ठिबक स्प्रिंकलर विक्रेता विनापरवानगी एचडीपीई पाईप चा प्लांट चालवत आहे त्यामुळे विनापरवानगी सुरू असलेला हा प्लांट तात्काळ बंद करण्यात यावा याकरिता बोडखा गावातील पत्रकारअमोल ठाकरे व तालुक्यातील नागरिकांनी प्रभारी तालुका कृषी अधिकारी गवई यांनाशुक्रवार 24 सप्टेंबर रोजीलेखी तक्रार दिली

सदर दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की बोडखा गावात रहदारीच्या ठिकाणी ठिबक स्पिंकलर विक्रेता ठाकरे यांच्या जागेत विनापरवानगी एचडीपी पाईप बनविण्याचा प्लांट सुरू आहे ठिबक स्पिंकलर पाईप बनविण्याचा प्लांट अनधिकृतरित्या बोडखा गावामध्ये कुठलीही परवानगी न घेता सुरू आहे तसेच हा प्लांट सुरू करताना गावातील आजूबाजूंच्या स्थानिक नागरिकांची ना हरकत घेतली आहे का सदर ठिकाणी जो अवैधरीत्या जो प्लांट सुरू आहे त्या ठिकाणी महावितरणचे सी एल मीटर व्यावसायिक मीटर बसविण्यात आले आहे का की घरच्याच डी एल मीटर वर हा नॉनआय एस ओ एच डी पी ई पाईप बनविण्याचा प्लांट सुरू आहे संबंधित प्लांट चालक या सुरू असलेल्या प्लांट चा कर रिटर्न भरतो का जो माल या प्लांट मधून विक्री करण्यात येतो त्याचे बिल ग्राहकांना देतो का सदर प्लांटला कृषी आयुक्त कार्यालयाची परवानगी नसताना हा प्लांट कसा सुरु आहे ज्या ठिकाणी हा प्लांट सुरू आहे त्या ठिकाणी एचडीपी पाईप चे मटेरियल आहे त्यावर सी एम एनंबर आहे का याची सखोल चौकशी करण्यात यावी व अवैधरित्या सुरु असलेला एच डी पी ई पाईपचा प्लांट तात्काळ बंद करण्यात यावा अशी तक्रार अमोल ठाकरे एकनाथ दुतोंडे रवींद्र अवचार यांनी तालुका कृषी अधिकारी गवई यांच्याकडे केली आहे