Home शेगाव विशेष माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर

माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर

खामगाव : माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर तसेच रिलीफ मेडिकल अँड जनरल स्टोअर चे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उद्या दिनांक 27 रोजी माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय काँग्रेस शेगाव यांचेकडून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यापैकी अल्पसंख्यांक सेलच्या वतीने आज दिनांक 26 रोजी अकोल्याचे प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर सरजू उडणकाट यांच्या मार्गदर्शनात मोफत भव्य नेत्रतपासणी शिबिर बाजार फैल शेगांव येथे घेण्यात आले त्याच वेळी रिलीफ मेडिकल स्टोअर अंड जनरल स्टोर चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर असलम खान यांच्या नेतृत्वात घेण्यात आला या शिबिरात शेकडो शिबिरार्थं यांनी शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमाच्या वेळी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर असलम खान यांचेसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दयाराम वानखडे, काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील,माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले, माजी नगराध्यक्ष शैलेन्द्र दादा पाटील,जयंतराव खेडकर, बुडन जमदार, शहराध्यक्ष दिपक सलामपुरीया, केशव हिंगणे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर सहारा, डि. के. शेगोकार, बसंत शर्मा, पवन पचेरवाल, लक्षमण गवई, शेख हाशम, भिकु सारवण, शेख असलम अनिल सावळे, शेख जब्बार, आसीफ खान व आदि लोक उपस्थित होते.