Home कृषि वार्ता आता शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखा प्रर्यंत बिनव्याजी कर्ज बुलडाणा जिल्हा बँक ग्राहकांच्या...

आता शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखा प्रर्यंत बिनव्याजी कर्ज बुलडाणा जिल्हा बँक ग्राहकांच्या दारी!

 

खामगाव – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक ( नाबार्ड) दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ आर्थिक व डिझिटल साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखा प्रयत्न बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला असून तसा जीआर मिळताच बुलडाणा जिल्हा बँक सुद्धा शेतकरी बांधवांना तीन लाख रुपया प्रयत्न बिनव्याजी कर्ज देईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.


या अभियानाच्या अंतर्गत आज खामगाव तालुक्यातील पारखेड येथे मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ संगिता सरदार होत्या. तर कार्यक्रमास स्वप्नील ठाकरे पाटील, बँकेचे अधिकारी शंकर देशमुख, भानुदास मिरगे , कीर्ती कुमार सातपुते, श्री इंगळे साहेब, सुरेश मिरगे, विकास अधिकारी अजय देशमुख , रुपेश सरदार, उपसरपंच प्रतापसिंह राठोड, रामदास गावंडे, नरेंद्र शिंगोटे यांची उपस्थिती होती. यावेळी नागरिकांना बँकेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच फसवणूक होऊ नये तसेच अन्य काळजी घ्यावी याबाबत जागृती करण्यात आली. यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली तसेच एटीएमचा वापर व बँकेचे व्यवहार कसे करावे याबाबत व्हॅन व चित्रफितीद्वारे डेमो दिला. प्रमुख अतिथी स्वप्निल ठाकरे पाटील यांनी जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची हिताचे असून नागरिकांनी महा विकास आघाडी सरकारने तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन व आभार प्रदर्शन गजानन बुरकुल यांनी केले.