Home जागर बसने मोफत पाठ्यपुस्तके गावोगावी रवाना!

बसने मोफत पाठ्यपुस्तके गावोगावी रवाना!

 

ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाकरिता शिक्षण विभागाची मोफत पाठ्यपुस्तके शाळेवर पोहचली

शेगांव : कोरोना संसर्ग संक्रमनच्या संभाव्य तिसरी लाटेची उद्भवणारी परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू आहे,इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन,ऑनलाईन शिक्षणाकरिता मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत गटशिक्षणाधिकारी पी.डी.केवट यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पाठ्यपुस्तक वितरणाचे प्रमुख विक्रम फुसे व त्यांना या कार्यात सहकार्य करणारे ज्ञानेश्वर घुले,अमोल पिंगळे,श्रीकांत सोनोने,योगेश गणोरकार,राहूल ससाने,रमेश वानखडे,जयेश गायकवाड,वंदना लोखंडे,साधना मुकवाने या विषय शिक्षकांच्या अथक परिश्रमाने दि.२३ सप्टेंबर रोजी नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.५ येथून तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळेवर पाठ्यपुस्तके रवाना करण्यात आलेली आहेत.


याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनिल घावट,परिवहन मालवाहतुक महामंडळाचे अधिकारी,चालक शिक्षण विभागाचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here