Home Breaking News रस्तावरील खड्डा की महामार्ग स्मारक; शेगावात अनोखं आंदोलन!

रस्तावरील खड्डा की महामार्ग स्मारक; शेगावात अनोखं आंदोलन!

शेगाव : अतिशय वर्दळीचा असलेला शेगाव खामगाव रोड वरील एम एस ई बी चौकातिल मधोमध पेवर ब्लॉक उखडून भलामोठा गड्डा झालेला आहे. हा खड्डा दुरुस्त करण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे हे सामान्य जनतेला समजेनासे झाले आहे नगरपालिका म्हणते तो रस्ता आमच्या अखत्यारित नाही सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा हेच उत्तर देत आहे त्यामुळे ह्या भल्यामोठ्या अनाथ असलेल्या खड्ड्याचा वाली कोण असा प्रश्न जनता विचारत आहे आज व्यंकटेश नगर मधील सामाजिक कार्यकते सोनू मो यांच्या नेतृत्वात आज दुपारी चार वाजता सदर खड्ड्याला राष्ट्रीय महामार्ग स्मारक असे नाव देऊन सदर खड्यावरील गोट्याला हार-फुले चळवळीत अनोखे गांधीगिरी स्टाइल आंदोलन व्यंकटेश नगर येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू मोहोड यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले राष्ट्रीय महामार्ग चा विजय असो राष्ट्रीय महामार्ग स्मारक चिरायू होवो अशा घोषणा देत तसेच राष्ट्रीय महामार्ग स्मारक असे सदर एखाद्याला नाव देत आंदोलन केले

सदर खड्डा बुजवावा अशी मागणी सामान्य नागरिकांसह नगरसेवक देखील करीत आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हे अनोखं आंदोलन केले त्याचप्रमाणे या आंदोलनाची ची दखल आता तरी राष्ट्रीय महामार्गाचे जिल्ह्यातील पदाधिकारी घेतील काय असा प्रश्न सामान्य लोकांना पडत आहे.
या आंदोलनात
सोनु गुलाबराव मोहोड.विजय लांजुळकार,निलेश पाखरे ., प्रशांत पवार , प्रशांत पाटीलपैक, विनोद शेगोकार सहभागी झाले होते