Home राजकारण संभाजी ब्रिगेड शेगांव नगर परिषदेच्या मैदानात

संभाजी ब्रिगेड शेगांव नगर परिषदेच्या मैदानात

खामगाव :संभाजी ब्रिगेड शेगांव नगर परिषदेच्या मैदानात उतरणार आहे. आज शेगाव येथे संभाजी ब्रिगेड ची बैठक पार पडली. या बैठकीला प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष योगेश पाटील आणि खामगांव तालुका अध्यक्ष कृष्णा वालोदे हे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आकाश पवार तालुका अध्यक्ष विठ्ठल अवताडे, तालुका सचिव उमेश अवचार यांनी शेगाव शहरातील निवडणुकी विषयी चर्चा केली. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड पूर्ण तकतीनिशी आपले उमेदवार उभे करेल आणि निवडून आणेल सोबतच संभाव्य उमेदवारांची चाचणी करून त्यांना ही संधी देऊ ईच्छुक उमेदवारांनी संपर्क करावा असे जिल्हाध्यक्षा योगेश पाटील म्हणाले.

हमी भाव आणि दारू मुक्त गाव अजेंड्यावर

शिव शाहू फुले आंबेडकर विचाराचा वारसा घेऊन संभाजी ब्रिगेड सक्रिय राजकारणतून प्रस्थापित पक्षाला पर्याय आता फक्त संभाजी ब्रिगेड असेल असे त्यांनी सांगितले तर आगामी निवडणुकीत रोकडीयानगर परिसरातून असणारी जागेचा दावेदार मी स्वतः असल्यामुळे ही जागा संभाजी ब्रिगेड जिंकेलाच आणि शहरातील विविध भागातील जागा आपण लढाऊ आणि जिंकू त्यामुळे ज्यांना इच्छा असेल त्यांनी मुलाखत द्यावी असे आव्हान तालुका अध्यक्ष विठ्ठल अवताडे यांनी केले
या बैठकीला शहर कार्यकारणी पदाधिकारी आणि विठ्ठल अवताडे मित्र मंडळी द्यानेशावे निंबाळकर अक्षय गावंडे पवन हिवरखेडे वैभव धुमाळे तुषार दिखोळकर अंकुश ठाकूर अक्षय घुले प्रशांत कहार श्याम कुरावडे अमित वाढवणी यश ताथोड सतीश लंजुळकर श्याम आढाव विठ्ठल लंजुळकार अविनाश शेजोले आदी मित्र परिवार उपस्थित होते
आढाव विठ्ठल लंजुळकार अविनाश शेजोले आदी मित्र परिवार उपस्थित होते.