Home Breaking News आता बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातच कॅन्सरचा ईलाज; प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया

आता बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातच कॅन्सरचा ईलाज; प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया

बुलडाणा, दि. 22 : जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. चिखली तालुक्यातील हातनी येथील 65 वर्षीय रुग्णावर मुख कर्क रोगा संदर्भात ‘टोटल मॅक्सीलॉक्टमी’ शस्त्रक्रिया प्रथमच यशस्वीरित्या करण्यात आली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच सामान्य रुग्णालयात झाली आहे. ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शना नुसार मुख व मानेचे कर्क रोग डॉ राम पाटील, पुणे यांनी ही मुख कर्क रोगाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
शस्त्रक्रियेसाठी तब्बल 2 तास 40 मिनिट एवढा कालावधी लागला. शस्त्रक्रियेसाठी व्यवस्था अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी, डॉ. प्रशांत पाटील (कान नाक घसा तज्ज्ञ) डॉ सुशील चव्हाण,(नाक कान घसा तज्ज्ञ ) यांनी उपस्थित राहून केली. तसेच फिजीशियन डॉ वासेकर, भुलतज्ज्ञ डॉ उंबरकर, डॉ मनिषा रेड्डी, मुख व दंत रोग तज्ज्ञ डॉ अनुजा पाटिल, डॉ सोनाली मुंडे, डॉ मेटकर, तंबाखु नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समन्वयक डॉ लता भोसले आणि स्वतः जातीने जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. तडस बुलडाणा जिल्ह्यातील प्रथमच होऊ घातलेल्या शस्त्र क्रियेदम्यान संपूर्ण उपस्थिती राहून मार्गदर्शन केले. जिल्हा रुग्णालयातील दंत विभागाचे डॉ. मेटकर आणि डॉ सोनाली मुंडे यांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी रोग निदान व शस्त्रक्रियेपर्यंत सर्व बाबतीत पुढाकार घेऊन मोलाचे सहकार्य केले. रुग्णासाठी कृत्रिम टाळू बनविण्यासाठी तंत्रज्ञ ज्ञानेश्वर पवार यांनी महत्व पूर्ण कार्य केले. रुग्णालयातील नर्सिंग सिस्टर जोशी, जाधव, पाटील, मोगल व कर्मचारी श्री. इंगळे यांनी सहकार्य केले.
तसेच स्वतः रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी धैर्य ठेऊन मोलाचे सहकार्य केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम ओपीडी 33 येथील समुपदेशक लक्ष्मण सरकटे व सामाजिक कार्यकर्ता अर्चना आरख यांनी रुग्णाला तंबाखू मुक्त होण्यासाठी पाठपुरावा केला. टाळूचा कर्करोग बिडी किंवा सिगारेट च्या व्यसनामुळे होतो. मुख व मानेचे कर्करोग तज्ज्ञ डॉ राम पाटील हे जिल्ह्याचे भूमिपुत्र असून वरवंड ता. जि. बुलडाणा येथील मूळ रहिवाशी आहेत.

या दिवशी होईल तपासणी

डॉ राम पाटील यांनी आत्तापर्यंत मुख व मानेचे कर्क रोगाचे 2100 च्या अधिक शस्त्रक्रिया यशस्वी पद्धतीने पार पडल्या आहेत. सध्या डॉ. पाटील पुणे येथील केयर कुब हॉस्पिटलमध्ये कर्क रोग विभागाचे प्रमुख आहेत. तसेच पुणे येथील सह्याद्री ग्रूप ऑफ हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल व इतर अनेक नामांकीत हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.
त्यांचे आजोबा स्व. भिमराव धंदर यांचे स्मरणार्थ ते जिल्ह्यातील रूग्णांची सेवा व्हावी, या उदात्त हेतूने बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात महिन्याच्या दुसऱ्या सोमवारला ओपीडी 34 ला 10 ते 1 पर्यंत उपलब्ध असतात. “बुलडाणा कॅन्सर सोसायटी” या उपक्रमाच्या अंतर्गत 24 तास हेल्पलाईन नंबर 8530311333 यावर गरजू रुग्ण व नातेवाईक यांनी निदान व पुढील उपचारासाठी संपर्क साधून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. तडस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने केले आहे.
*****

हमसे जुडने के लिये संपर्क करे- 94 2323-7001

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here