Home Breaking News शेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध!

शेगाव कृऊबासवर ‘दादा’ यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध!

 

सहकार पॅनलचे सभापतीपदी शेषराव पहूरकार तर उपसभापतीपदी पुंडलिक भिवटे यांची अविरोध निवड

शेगाव: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती व उपसभापती पदाची अविरोध निवड होवून दादांचे दादागिरी कायम आहे. सभापती पदी सहकार पॅनलचे शेषराव पहूरकार रा.सवर्णा तर उपसभापतीपदी पुंडलिक भिवटे रा.गोळेगाव यांची अविरोध निवड झाली.


बाजार समितीचे सभापती श्रीधरराव उन्हाळे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने येथील बाजार समितीचे सभापती पद तर उपसभापती सुनील वानखडे अपात्र ठरल्याने त्यांचे उपसभापती पद रिक्त झाले होते.यामुळे बाजार समितीत बुधवारी ही निवडणूक पार पडली.याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नांदुरा सहकारी संस्था निबंधक अविनाश सांगळे तर सहाय्यक म्हणून बाजार समिती सचिव विलास पुंडकर यांनी कामकाज पाहिले.

 


या सभेला सहकार नेते,बाजार समितीचे जेष्ठ संचालक,तथा सहकार पॅनलचे सर्वेसर्वा पांडुरंगदादा पाटील,खामगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील,बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक श्रीधरराव उन्हाळे,संचालक श्रीधर पांडुरंग पाटील, निलेश राठी, सुरेश पाटील कराळे, रामरतन पुंडकर,संचालिका श्रीमती पंचफुलाबाई जवंजाळ,संचालक सौ नंदाबाई रमेश पाटील उमाळे आदींची उपस्थिती होती.सभेनंतर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा उपस्थित मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील उमाळे,किसनराव घाटे,बाळू उन्हाळे,मनसे तालुकाध्यक्ष रवींद्र उन्हाळे, मराठा पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष अविनाश बाठे,खवीस संचालक एकनाथ पाटील,अनिल शेजोळे,वर्ष शेजोळे,रमेश पाटील शेजोळे,बाजार समितीचे सचिव विलासराव पुंडकर,लेखापाल विनोद पुंडकर,निरीक्षक अनंत शेगोकार,कॅशिअर सौ सुनीता गावंडे,कर्मचारी नागोराव डाबेराव,उमेश कुळकर्णी,नितीन तायडे, उपस्थिती होती.

व्यापारी असो.कडून सत्कार

नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा व्यापारी असोसिएशनचे वतीने अध्यक्ष संजयसेठ टीबडेवाल यांनी सत्कार केला.