Home Breaking News ड्युटी आटोपून घरी जात असताना नर्सवर काळाची झडप

ड्युटी आटोपून घरी जात असताना नर्सवर काळाची झडप

खामगाव –  गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात नर्स ठार झाल्याची दुःखद घटना आज सायंकाळी जळगाव जामोद येथे घडली आहे. तालुकाा आरोग्य अधिकारी कार्यालयातून ड्युटी आटोपून घरी जात असतांना त्यांच्यावर काळानेेे झडप घातली.
शेवंता लक्ष्‍मण भगत वय 47 असे मृत महिलेचे नाव आहे जळगाव जामोद येथे सायंकाळी न्यू इरा हायस्कूल समोर ही घटना घडली. वाहनााच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या शेवंता भगत यांना उपचारासाठी प्रथम जळगाव व नंतर खामगाव येथे आणण्यात आले मात्र उपचारादरम्यान उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक महिला नर्स म्हणून आरोग्य विभागात कार्यरत होत्या. पर्यंत वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर खामगाव सामान्य रुग्णालय आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक अशोक मूरुख व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हमसे जुडने के लिये संपर्क करे- 94 2323-7001

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here