Home जागर विसर्जनस्थळी जीवरक्षक तैनात;ओमसाई फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम

विसर्जनस्थळी जीवरक्षक तैनात;ओमसाई फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम

 

News by: प्रविण डवंगे

नांदुराः सलग दुसऱ्या वर्षीचा गणेशोत्सव कोविडमुळे साध्या पद्धतीने पण भक्तीभावाने साजरा करण्यात आला अनंत चतुर्दशीला म्हणजे बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी शहर व तालुक्यातील घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळे यांची पूर्णा नदीवर आबालवृद्ध, महिला,युवकांसह एकच गर्दी होत असल्याने व यंदा वरुणराजा दमदार बरसल्याने पूर्णामाय तुडुंब भरून वाहत असल्याने श्रीं च्या विसर्जनादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडून विसर्जनाला गालबोट लागू नये याकरीता व्रतस्थपणे सेवाकार्य करणाऱ्या ओमसाई फाऊंडेशनच्या वतीने पूर्णा नदीवर लाईफ जॅकेट,गोल ट्युब, इतर संरक्षण साहित्य व रुग्णवाहिकेसह १०जीवरक्षकांची तैनाती करण्यात आली होती याप्रसंगी पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी विसर्जन स्थळाला भेट देत फाऊंडेशनच्या या उपक्रमाची माहिती घेऊन अध्यक्ष विलास निंबोळकर व त्यांच्या संपूर्ण टीमचे पोलीस प्रशासनाच्या वतीने आभार मानले
या विधायक उपक्रमाकरीता पत्रकार प्रवीण डवंगे,कमलेश बोके,किरण इंगळे,पियुष मिहाणी, आनंद वावगे,राजुभाया ,श्रीराम निंबोळकर, प्रशांत अढाव,रामा काळदाते,दिपक कोल्हे,स्वप्नील पाटील, कपिल पाटील, श्याम जुमळे,आश्विन फेरण,क्रिष्णा वसोकार आदी स्वयंसेवकांसह नांदुरा पोस्टेचे पोकॉ प्रशांत धंदर,पोकॉ सुनील गायकवाड, वाहतूक विभागाचे मोरे आदींनी रात्री उशिरापर्यंत विसर्जनस्थळी आपली सेवा दिली विशेष म्हणजे छायाचित्रकार दत्ता साबळे यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या (तिसरा डोळा)माध्यमातून संपूर्ण विसर्जनादरम्यान बारकाईने लक्ष ठेवले