Home Breaking News ‘प्रहार’ ने जाळले नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचे पुतळे

‘प्रहार’ ने जाळले नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचे पुतळे

गणपती विसर्जनाची पालिकेने विटंबना केल्याचा आरोप 

शेगांव : शहरात काल गणपती विसर्जनादरम्यान नगरपालिकेच्या वतीने चौकाचौकात वाहने लावून त्यात गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वीकारण्यात आली यावेळी विसर्जनासाठी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्या पाण्याच्या टाक्या ह्या घाणीने होत्या त्यामुळे अस्वच्छ माखलेल्या टाक्यांमध्ये या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचा हा प्रकार म्हणजे नगरपालिकेने हा प्रकार गणपतीची विटंबना केल्याचा आरोप करून प्रहार संघटनेच्या वतीने आज गांधी चौकात पालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा पुतळा जाळण्यात आला यावेळी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली . नगरपालिका प्रशासनाचा निषेध असो, मुर्दाबाद मुर्दाबाद नगरपालिका प्रशासन मुर्दाबाद, नगराध्यक्षांचा निषेध असो, आदी घोषणा यावेळी करण्यात आल्या.प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा नीलेश घोंगे राजू मसने, सागर घुले निखिल काठोळे, नितीन टवरे, विकी सारवान कुशल सारवान,अजय बोरसे आदींसह प्रहारचे कार्यकर्ते यावेळी या आंदोलनात सहभागी झाले होते.

मागील वर्षीही पालिकेच्यावतीने गणपतीची मूर्ती गोळा करून ती एका नाल्यात टाकण्यात आली होती तो प्रकार झाल्याने त्यामुळे गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या होत्या पुन्हा तशीच पुनरावृत्ती होत असल्याने याबाबत नाराजी व्यक्त करून पालिका प्रशासन हा प्रकार खोडसाळपणे तर करीत नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे.