Home जागर नकारात्मक विचार व वाईट सवयींचे विसर्जन करा : आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

नकारात्मक विचार व वाईट सवयींचे विसर्जन करा : आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

श्री चंदनशेष गणेशोत्सव मंडळाने साधेपणाने दिला बाप्पाला निरोप

खामगाव : खामगांव शहरातील देशमुख प्लॉट भागातील श्री चंदनषेश क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने रांगोळी स्पर्धा, स्वच्छता अभियान,वृक्षारोपण,भजनसंध्या असे विविध विधायक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

19 सप्टेंबर 2021 रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी श्री चंदनषेश गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विघ्नहर्ता गणरायाचे पुजन करुन गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व मंडळाच्या सदस्यांनी सी.एम.हेल्थ क्लबच्या प्रांगणात छोटया कुंडामध्ये गणरायाचे मुर्तीचे विसर्जन केले.

यावेळी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी गणपती विसर्जनासोबतच सर्वांनी राग, द्वेश, मत्सर, लोभ,आळस, नकारात्मक विचार व वाईट सवयींचे विसर्जन करावे असे आवाहन करुन कोरोनाचे संकट टळुन सर्वांना उत्तम आरोग्य लाभो,सर्वांचे विघ्न दूर होवो अषी प्रार्थना गणराया चरणी केली.यावेळी गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्शी लवकर या, हम सब एक है अष्या गगनभेदी घोशणा देण्यात आल्या.याप्रसंगी श्री.चंदनशेष मंडळाचे अध्यक्ष प्रताप कदम,आखाडा प्रमुख अमर पिंपळेकर, नगरसेवक भूषण शिंदे, सुरेंद्र चव्हाण, राजुभाऊ आटोळे, संतोश आटोळे,गणेशभाऊ रिंढे, किशोरभाऊ जाधव,गोटु गावंडे,प्रेम आटोळे,शैलेश पवार,मंगेष खोंड,राम माजगांवकर यांच्यासह श्री.चंदनषेश गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.