Home दुःखद बातमी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

नांदुरा : गणपती विसर्जन पाहण्यासाठी नदीकाठावर गेलेल्या अक्षय संदीप वानखेडे राहणार सरसोळा वय 18 वर्षे या युवकाचा पाय घसरून नदीत पडल्याने युवक बुडाल्याची घटना नांदुरा तालुक्यातील निंबोळा या गावाजवळ आज दुपारी घडली असून रात्री उशिरापर्यंत युवकाचे प्रेत मिळून आले नाही.निंबोळा देवी संस्थान च्या मागे विश्व गंगा नदी पात्रात आज दुपारपासून गणपती विसर्जनाचे कार्य सुरू होते दरम्यान हा युवक विसर्जन पाहण्यासाठी गेलेला असताना ही घटना घडली आहे. घटनास्थळी वडनेर भोलजी पोलिस चौकीचे इन्चार्ज एपीआय मानकर पोलीस, हेड कॉन्स्टेबल निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल कंदेल, नायब तहसीलदार चव्हाण यांच्यासह गावकरी बुडालेल्या तरुणाचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here