Home Breaking News सुदैवाने मोठी हानी टळली ! बस अपघातात 16 प्रवाशी जखमी

सुदैवाने मोठी हानी टळली ! बस अपघातात 16 प्रवाशी जखमी

मोताळा : आज सकाळी सोनाळा बुलढाणा जाणाऱ्या बसला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने बस मधील 15 ते 16 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी सहा प्रवासी हे गंभीर जखमी आहेत. तर नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना मोताळा बुलढाणा मार्गावरील मोहेगाव या गावाजवळ घडली.

याबाबत बोराखेडी पोलिस स्टेशनला सदरची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब येऊन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. सोनाळा बुलढाणा बस क्रमांक एम एच 14 47 57 राजूर घाटा समोरील मोहेगाव जळून जात होती.  यावेळी ट्रक वाल्याने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे एसटीला जोरदार धडक बसून एसटी चा पत्रा सर्व कापत गेला या ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक व बस मध्ये मोठी धडक झाली.  15 ते 16 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त असून सहा प्रवासी गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे ट्रक रस्त्याच्या एका बाजूला उलटला असून बस चे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे.  सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे दाखल केल्याचे समजते यावेळी नागरिकांनी मदत केल्याचे वृत्त आहे.