Home धर्म जागरण नरहरी महाराजांच्या भक्तीगीतांचा मनोभावे प्रसार करणारे अनिल जोजारे!

नरहरी महाराजांच्या भक्तीगीतांचा मनोभावे प्रसार करणारे अनिल जोजारे!

 

मुलाखत प्रस्तुती : आत्माराम ढेकळे, पुणे (मुक्त पत्रकार)

संत हेच परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवु शकतात .सत्संगामुळे अध्यात्माची गोडी निर्माण होते.या क्षेत्रात जेंव्हा असे सुप्त गुण लहान मुलापासुन समाजात येतात .तेंव्हा ”देवाची देणगी” म्हणुन त्याचे सर्वत्र कौतुक होते.असेच एक कौतुकास पात्र असलेले औरंगाबाद येथील समाज बांधव अनिल प्रभाकर जोजारे यांची *संतशिरोमणी नरहरी महाराज* यांच्या भक्तीगीतांचा प्रसार माध्यमातून त्यांची जोपासना खरोखरच अभिनंदनीय आहे. ते स्वरचित गीत त्यास योग्य अशी चाल लावुन ते सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजासमोर त्याचे सादरीकरण करतात .अशा या कलावंताची औरंगाबाद दौऱ्यात त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली .तेंव्हा मन कसे भारावुन गेले.याप्रसंगी मुक्त चर्चा करीत असतांना त्यांनी प्रसन्न वदनेने प्रसिद्धीसाठी मुलाखत दिली.

सेवा नरहरीची या माध्यमातून विविध उपक्रम परभणी येथुन राबविले जात असल्याची माहिती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संतोष ज्ञा.शहाणे यांचेकडून मिळत असते.संत नरहरी सोनार यांच्या कार्याची माहिती अंभग,भक्तीगीत माध्यमातून सोशल मिडिया,व्हाट्सअॕपवर विडियो,माहिती देणारे गायक अनिल जोजारे यांचेही नांव चर्चेत आले.व त्यांची ओळख झाली.संत नरहरी महाराजांचा परिचय भावी पीढीला सहजरित्या व्हावा.या उद्देशाने त्यांचा प्रयत्न असतो.याबाबत अभ्यासपुर्ण स्वरचित गीत व त्यास सर्वांना आवडेल अशी चाल देवुन ते स्वतःच्या आवाजातुन सादर करतात.नरहरी महाराजांचा महाराष्ट्रात प्रथमच अल्बम त्यांनी जिद्दीने स्वखर्चाने काढला असुन यामध्ये त्यांच्या अभंगास प्रसिद्ध भक्तीगीतांच्या चाली दिल्या आहेत.शिवाय स्वतः चरित्रात्मक गीत त्यांनी या अल्बम मध्ये रचले असे मिळुन ३०ते ३५ गीतांचा यामध्ये समावेश आहे.संत नरहरी महाराजांच्या जयंती,पुण्यतिथी या कार्यक्रमात देखील या गीताद्वारे महिमा पोहचविण्याचे त्यांचे निस्वार्थपणे कार्य आहे. साहित्याचा अभ्यास करुन स्वरचित गीतरचना चालीसहीत करुन स्वतः स्टुडियो मध्ये जाऊन उत्साहाने सादर करतात .आत्तापर्यंत ४०ते ५०गीत, ४सी.डी. तर आॕडियोमध्ये २० गीत, विडियोमध्ये १०गीत असे स्वखर्चाने तयार करुन समाजात प्रसारीत केले आहे.हे विशेष !

अनिल जोजारे हे खाजगी कंपनीत नौकरीस असुन उर्वरित वेळेत ते गायनाचा छंद जोपासतात.लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड असल्यामुळे त्यांनी पुढे शास्त्रीय संगीत शिक्षण घेतले व गीतरचना करुन उत्साहाने सादर करण्याचा छंद जोपासला.अभंग,गीत निर्मिती करुन सादरीकरणात अनिल जोजारे यांची निर्मिती ,रचना,निवेदन,लेखन ची भुमिका असते.संगीत ,संयोजन,ध्वनीमुद्रन स्थानिक ‘राज डिजीटल’ स्टुडियोमध्ये जाऊन करतात तर कांही गीत म्युझिक ट्रॕक तयार करुन उत्साहाने ते गातात . या कार्यात त्यांना प्रामुख्याने त्यांचे प्रतिभावान कुटुंबाचे सहकार्य मिळते.त्यामध्ये पत्नी राजश्री जोजारे,मुलगा ओम जोजारे,गायनाची आवड असणारी गुणवान मुलगी रेणुका जोजारे हिचे नुकतेच तिने विज्ञान व वनस्पती मध्ये आवड ठेवुन दुर्लभ वनस्पतीचे रेखाटन करुन निसर्ग माता दर्शविली आहे.या कलाकृती बद्दल इंडिया बुक आॕफ रेकाॕर्ड’ ने दखल घेऊन तिच्या कलाकृतीची नोंद २०२२ मध्ये होणार आहे.अशा या गुणसंपन्न कुटुंबाची ,नातेवाईकांच्या प्रेरणेने त्यांना साथ मिळते.संत नरहरी महाराजांनी आपल्या अंभगातुन शुध्द भक्ती मार्गाचे प्रबोधन केले आहे.त्यानुसार अशा या संताची ओळख ,सोनार समाजाचे महत्त्व तसेच सोनार हा श्रेष्ठ आहे हेच गायक जोजारे यांनी दाखवुन दिले आहे.”देऊ संदेश साऱ्या जगाला, मागे नको राहु तु रे सोनारा.”आदी गीत माध्यमातून ते प्रबोधन करीत असतात.त्यांचा सर्वांगीण अभ्यास असल्यामुळे संत नरहरी महाराजांचे मुळ अंभग *देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार*|| ध्रुवपद व अंतरे मिळुन नऊ अंतऱ्याचे असुन त्यास देखील स्वतः नवीन चाल बसवुन प्रथमच समाजासमोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे त्यांच्या स्वछंदातुन नवीन माहिती मिळते.त्यांच्या या निस्वार्थ कार्यास समाजातुनही प्रोत्साहन ,प्रेरणा मिळतात.वास्तविक पाहता कोणतेही चांगले कार्य करीत असतांना जीवनात चांगले वाईट अनुभव येत असतात.त्याचा सामना ,संघर्ष करीत वाटचाल करायची असते.त्यानुसारच त्यांची यशस्वी घोडदौड आहे.ध्येय व संकल्पमध्ये शक्ती असते.त्यामुळे प्रत्येकालाच यश मिळते.सकारात्मक दृष्टिकोन ठेवुन कार्य केल्यास कार्यपुर्ती होते व त्याचा प्रत्यय येत असल्याचे तसेच यामुळे आनंद ,समाधान मिळते .असेही विविध प्रसंगाची आठवण करुन त्यांनी यावेळी व्यक्त केले.

संत नरहरी महाराजांचे कार्य व चरित्र समाजासमोर आणण्याची त्यांची तळमळ पाहुन त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतुने औरंगाबाद येथील प्रतिष्ठित मान्यवर व्यक्तीच्या वतीने  समाज पुरस्कार देऊन उदयोन्मुख गायक अनिल जोजारे यांना गौरविले आहे.समाजातील महत्वाचा पुरस्कार स्व.अण्णासाहेब रांजनगावकर (रवी पेंटर) स्मृती प्रतिष्ठान, औरंगाबाद च्या वतीने नाना शंकरशेठ पुरस्कार न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मराठवाडा लाड सुवर्णकार बहुउद्देशीय विकास मंडळ ,औरंगाबाद च्या वतीने अध्यक्ष भास्करराव टेहरे यांच्या हस्ते बसमाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच पुणे येथेही श्री संत नरहरी सोनार विकास सेवा संस्था (महा.) आयोजित “सुवर्णकार सराफ महा अधिवेशन” मध्ये सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.प्रामुख्याने त्यांच्या या अध्यात्म कार्याची दखल नागपूर येथील श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानने देखील घेऊन त्यांना  श्री संत नरहरी महाराज समाज गौरव पुरस्कार आयोजित संत नरहरी महाराज जयंती दिनी व रोजगार दिवस कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते अनिल जोजारे यांना पत्नी सौ.राजश्री जोजारे समवेत स्मृती चिन्ह प्रमाणपत्र, शाल श्रीफळ देऊन सन्मानाने गौरविण्यात आले.विदर्भातील नागपुर येथे याप्रसंगी गायक अनिल जोजारे यांनी सादर केलेल्या अभंग ,गीत हे मनमोहक होते. त्यामुळे त्यांची नविन ओळख झाली. तर येथील रसिकांनीही त्यांना दाद दिली. प्रामुख्याने श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.अंजलीताई सुरेशराव अनासने यांच्या सहकार्याने त्यांच्या कार्याचा व कलागुणाचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने विविध ठिकाणी त्यांना अभंग ,भक्तीगीत सादर करण्याची संधी मिळाली.त्यांचे स्वागत झाले.त्यामुळे अतिशय प्रभावित होऊन त्यांनी व्यक्त केले की, जीवनात भाग्यशाली हा क्षण असुन हे संचित पुण्य असणाऱ्या व्यक्तींनाच असे सद् भाग्य लाभते.याबद्दल धन्यता व्यक्त करीत आहे. अशा ह्या निस्वार्थपणे संत नरहरी महाराजावर निस्सीम भक्ती ठेवुन कार्य करणाऱ्या अनिल प्र.जोजारे यांच्या कार्यास समाजातुन भरघोस प्रतिसाद मिळावा.त्यासाठी मनस्वी शुभेच्छा.