Home रिसोड वृत्त संघर्ष एसटी कामगार युनियनची रिसोड आगार कार्यकारिणी जाहीर

संघर्ष एसटी कामगार युनियनची रिसोड आगार कार्यकारिणी जाहीर

कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नरत्न-डेपो अध्यक्षधनंजय विखे

धनंजय विखे

कामगारांच्या न्यायहक्काकरिता सदैव झटणार- प्रसिद्धी प्रमुख अनिल गिऱ्हे

अनिल गिर्हे

रिसोड(प्रतिनिधी)-: मुंबईतील बेस्ट कामगारांचे प्रणेते आणि संघर्ष एसटी कामगार युनियन ची धडाडती तोफ शशांकराव यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कर्मचारी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी व आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी संघर्ष एसटी कामगार युनियन उदयास आणली. त्यामुळे खरोखरच कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अल्पावधीतच तमाम एसटी कामगारांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एकमेव निष्पक्ष निर्भीड संघटना म्हणून या संघटनेचे नाव समोर आले आहे.संघटनेचे सर्व्हेसर्वा सरचिटणीस शशांकराव व उदय भट्ट यांच्या माध्यमातून राज्यभरात सर्वत्र एसटी आगार पातळीवर संघर्ष एसटी कामगार युनियन ची कार्यकारिणी जाहीर करण्यात येत आहे.आज राज्य परिवहन च्या अकोला विभागातील रिसोड आगारात नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये *रिसोड आगार अध्यक्षपदी धनंजय विखे,उपाध्यक्ष पदी वसीम बेग,सचिव पदी भागवत धोंडगे, सहसचिव संजय पवार, कोषाध्यक्षपदी गणेश वायभासे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून अनिल गिऱ्हे  यांची कामगारांच्या माध्यमातून एकमताने निवड करण्यात आली असून एसटी कामगार युनियन ही कामगारांच्या हिताला सर्वप्रथम प्राधान्य देणार असून कुठल्याही कामगारांवर अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी युनियन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आगार अध्यक्ष धनंजय विखे पाटील यांनी राज्य परिवहन रिसोड आगारातील हनुमान मंदिरात जाहीर झालेल्या कार्यकारिणी च्या बैठकीत केले आहे.मुंबई बेस्ट कामगारांचे कामगार नेते शशांकरव साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत एसटी कामगारांचे भले करण्यासाठी आम्ही कार्य करणार असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून प्रत्येक आगार पातळीवर आमची कार्यकारिणी जाहीर होत असून कामगार प्रचंड प्रमाणात संघर्ष एसटी कामगार युनियन चे सभासदत्व स्वीकारत आहे.शशांकराव साहेब व उदय भट्ट साहेब प्रणित संघर्ष एसटी कामगार युनियन चे सभासद प्रचंड प्रमाणात तयार होत असून पुढच्या काळात महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लालपरी ला व तिच्या लेकरांना नवसंजीवनी प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत उपाध्यक्ष वसीम बेग यांनी व्यक्त केले.

एसटी मधील संघटनांचे डावपेच बाजूला सारून फक्त कामगारांसाठी झटणाऱ्या या युनियन ने कर्मचारी हिताच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्यसरकार कडे तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपल्या संवेदना व्यक्त केल्या असून त्यादृष्टीने युनियनने आपला आरसा असलेल्या कर्मचारी वर्गातून आपली “न भूतो न भविष्यती” ही रणनीती आखत आहे.त्यामुळे एसटी मधील युवा वर्ग असलेल्या कर्मचाऱ्यांनि संघर्ष युनियन ला प्रथम पसंती दर्शविली आहे.त्यामुळे एकंदरीतच एसटी कामगारांचे भले करण्यासाठी व गोरगरिबांच्या लालपरी ला टिकवण्यासाठी संघर्ष युनियन ही कायम कामगारांच्या स्मरणात राहील,यामध्ये तिळमात्र शंका नाही. एवढे मात्र नक्की!