Home Breaking News अवैध वृक्षतोड प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा : सचिन ठाकरे

अवैध वृक्षतोड प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा : सचिन ठाकरे

खामगाव : जवळच असलेल्या सुटाळा खुर्द येथील वनविभागाची परवानगी न घेता जुने मोठे झाड तोडण्यात आले. या अवैध वृक्षतोड प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते सचिन ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान याबाबत योग्य ती कारवाई करण्याचा ठराव ग्रामपंचायतने ठराव घेतला आहे.

सुटाळा खुर्द येथील अनिकट रोडवर ४० ते ५० वर्षे जुने निंबाचे झाड होते. हे झाड कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तोडण्यात आले.

याबाबत अधिक माहिती घेतली असता प्लॉट लगत डागा नामक व्यक्तीचा प्लॉट आहे. त्यांनी मोहनीदेवी डागा यांच्या नावाने झाड तोडण्याबाबत परवानगी मागितली होती. मात्र सचिव यांनी त्याना वन विभागाची परवानगी घ्यावी असे त्यांना सांगितले. मात्र अशी परवानगी न घेता वृक्ष थोड करण्यात आली. विशेष म्हणजे याबाबत स्थानिक नागरीकांनी वृक्ष तोड बाबत आक्षेप घेतला असता त्यांना चुकीची कागदपत्र दाखवण्यात आली.

अवैध वृक्ष तोड हा कायद्याने गुन्हा असून याबाबत संबंधित व्यक्ती विरुद्ध ग्रामपंचायतने गुन्हा दाखल करण्याकरिता योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सचिन ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान याबाबत तलाठी, सचिव यांनीही अहवाल दिला आहे.