Home बदली आदेश खामगाव तहसीलदारपदी अतुल पातोडे; मोताळा, मलकापूर व येथे नवीन तहसीलदार ; शेगावच्या...

खामगाव तहसीलदारपदी अतुल पातोडे; मोताळा, मलकापूर व येथे नवीन तहसीलदार ; शेगावच्या शिल्पा बोबडे यांची बदली !

 

खामगाव: महाराष्ट्र सरकारने सन 2021- 22 मधील महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात खामगाव मोताळा, मलकापूर , देऊळगाव राजा येथे नवीन ते तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे तसेच शेगाव येथील तहसीलदार शिल्पा बोबडे यांची सुद्धा अकोला येथे बदली झाली असून त्यांच्या जागी नवीन तहसीलदार यांची नेमणूक केल्या जाणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात नव्याने रूजू होणाऱ्या तहसीलदार मध्ये धारणी जिल्हा अमरावती येथून अतुल पातोडे हे रुजू होणार आहेत तर मलकापूर येथे तेल्हारा येथील तहसीलदार राजेश सुरळकर, देऊळगाव राजा येथे वणी येथील तहसीलदार श्याम वनमणे, मोताळा येथे देऊळगाव राजा येथील तहसीलदार सारीका भगत ह्या रुजू होणार आहेत तर शेगाव येथील तहसीलदार शिल्पा बोबडे यांची अकोला येथे बदली झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here