Home Breaking News ‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू...

‘आनंदसागर’ विरोधातील याचिका खारीज तक्रारकर्त्यास दहा हजारांचा दंड ; आतातरी ‘आनंदसागर’ सुरू होईल का?

नागपूर : शेगावातील श्री संत गजानन महाराज संस्थांचा प्रकल्प असलेल्या आनंद-सागर विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका 15 सप्टेंबर रोजी मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने फेटाळून लावली आह.
नागपूर खंडपीठाने ही निकाली काढून याचिकाकर्त्याला दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.
शेगाव येथील अशोक गारमुळे यांनी श्री गजानन महाराज संस्थानच्या आनंद सागर प्रकल्प आणि प्रकल्पाच्या सौंदर्यीकरणा विरोधात नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका द्वेष भावनेतून दाखल करण्यात आली असल्याने न्या. सुनील शुक्रे, न्या.अशोक किलोर यांनी निकालात काढली आहे

कोण आहेत याचिकाकर्ता
शेगाव येथील एका व्यक्तीने आनंद सागर प्रकल्पाच्या विरोधात नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्यांचे नाव अशोक गारमोळे आहे. अशोक गारमुळे हे गजानन महाराज संस्थानमध्ये सेवेकरी होते. त्यांना दुसऱ्या ठिकाणी सेवा करण्यास संस्थानच्या वतीने सांगण्यात आले होते.मात्र त्यांनी संस्थानच्या औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली.अशोक गारमोळे कर्मचारी नसून सेवेकरी असल्यामुळे औद्योगिक न्यायालयाने त्यांची तक्रार फेटाळून लावली होती.

जनहित याचिका खारीज

त्यानंतर अशोक गारमोडे यांनी सन 2019 मध्ये आनंद सागर प्रकल्प व या प्रकल्पाचे सौंदर्यीकरण याला विरोध करणारी याचिका नागपूर हायकोर्टात दाखल केली होती.
याप्रकरणी न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली होती. त्यावर नगरपालिकेतुन या प्रकरणाची कॉपी घेऊन गजानन महाराज संस्थानला प्रतिवादी करावे या करिता हायकोर्टात दाखल करण्यात आलेला संस्थानचा अर्ज फेब्रुवारी 2020 मध्ये मंजूर करण्यात आला होता.

यानंतर हायकोर्टाने गारमोळे यांना या याचिकेत सुधारणा करण्याचे आदेश दिले होते मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि सुनावणी दरम्यान गैरहजर राहिले.त्यानंतर सुनावणीदरम्यान दरम्यान बुधवारी याचिका हायकोर्टाने निकालात काढली आहे आठ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली त्यामध्ये याचिका निकाली काढून तक्रारकर्त्या शब्दांमुळे यांना 10 हजार रुपया दंड पाठवण्यात आला आहे

गजानन महाराज संस्थान तर्फे अँड अरुण पाटील, नगरपालिकेतर्फे अँड. दिग्विजय खापरे आणि सरकार तर्फे अँड दीपक ठाकरे यांनी काम पाहिले.

आता आनंद सागर सुरू होईल का?

आनंद सागर प्रकल्पामुळे शेगावला विदर्भाची कन्याकुमारी अशी ओळख प्राप्त झाली होती. दररोज हजारो भाविक पर्यटन आणि तीर्थाटनासाठी शेगाव मध्ये येत होते. मात्र हा प्रकल्प बंद झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे तसेच व्यवसायावर सुद्धा अवकळा आली आहे .याचिका निकाली लागल्यानंतर आतातरी हा आनंद सागर प्रकल्प सुरू केला जाईल का, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.