Home खामगाव तालुका जिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड

जिल्हा केंद्रीय बँकेवर गजानन होगे यांची निवड

 

खामगाव-तालुक्यातील पिंप्री गवळी ग्राम सेवा सोसायटी मधून जिल्हा केंद्रीय बँक प्रतिनिधी म्हणून गजानन होगे यांची निवड करण्यात आली आहे.
लवकरच जिल्हा केंद्रीय बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजण्याच्या शक्यता निर्माण झाली आहे.त्या अनुषंगाने सहकार विभागाची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकी करीता ग्रामसेवा सहकारी सोसायटी मधून एक प्रतिनिधी निवडण्यात येतो. सध्या जिल्हाभर ही प्रतिनिधी निवड प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान नुकतीच पिंप्री गवळी येथे ग्रामसेवा सहकारी सोसायटीची आमसभा पार पडली. यामध्ये जिल्हा केंद्रीय बँकेवर मतदार प्रतिनिधी म्हणून जेष्ठ सदस्य गजानन रामकृष्ण होगे यांची निवड करण्यात आली. तसेच शेतकी खरेदी विक्री संस्थेवर मतदार प्रतिनिधी म्हणून नामदेव चतरकार यांची निवड करण्यात आली.या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.