Home Breaking News खामगावात येणारा गांजा पकडला! तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा...

खामगावात येणारा गांजा पकडला! तस्करी करणारी टोळी जेरबंद; 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त

 

चिखली : बुलढाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ विरोधी मोहीम स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 14 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते व पथकाने चिखली येथे कारवाई केली आहे. या कारवाईत तस्करी करणारी टोळी जेरबंद करून 20 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, जालना येथून मार्गे चिखली मार्गे खामगाव येथे एक ट्रक येत आहे. त्यामध्ये गांजा वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चिखली येथील खामगाव चौफुली जवळ एक ट्रक ताब्यात घेतल. या ट्रकमध्ये 87. 172 किलो ग्रॅम गांजा अंदाजे दहा लक्ष 43 हजार 440 रुपये, दहा लाख रुपये किमतीचा ट्रक व एक हजार रुपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत राजू रामराव पवार रा. शिवना तालुका सिल्लोड, सुषमा रोहिदास मोहिते रा. मोताळा, यमुना आप्पा चव्हाण रा. मोताळा, सपना राजू पवार रा. शिवना सिल्लोड, सुरेश बाबूलाल राहणार भवानीमंडी जलवा राजस्थान व एक चालक असे सहा जणांना ताब्यात घेऊन घेण्यात आले. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय अधिकारी बुलढाणा रमेश बरकते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राम गीते, चिखली ठाणेदार अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात साहेब पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, मनीष गावंडे, पोलिस उपनिरीक्षक निलेश शेळके तसेच प्रकाश राठोड, दशरथ जुमडे, गणेश पाटील, विजय सोनवणे, जयंत बोधे, संभाजी आसोलकर, दीपक वायाळ, मधुकर लगड तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी व चिखली पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी संयुक्त विद्यमाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here