Home Breaking News नदी, तलाव, धरणावर फिरायला जातांना जरा जपून ; यावर्षी 10 जण तर...

नदी, तलाव, धरणावर फिरायला जातांना जरा जपून ; यावर्षी 10 जण तर 6 वर्षात 35 बुडाले !

 

 

जिल्ह्यात 149 गावे होतात बाधीत

बुलडाणा : जिल्ह्यातील नदीकाठच्या 86 गावांना पुराचा धोका असतो.235 गावे संभाव्य पूर बाधित गावे म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. मोठ्या नद्यांमुळे 86 तर लहान नद्यांमुळे 11 गावे बाधित होतात. एवढेच नव्हे तर नद्या-नाल्यांमुळे 149 गावे बाधित होण्याची शक्यता असते. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास 1,70,00 लोकसंख्येला बाधा निर्माण होऊ शकते.

गत ६ वर्षात ३५ बळी !

गेल्या 6 वर्षांमध्ये जिल्ह्यात ३५ जणांचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. सन 2014 व 2017 वगळता 2015 मध्ये 3, 2016 मध्ये 2, 2018 मध्ये 1, 2019 मध्ये 6, सन 2020 मध्ये 12 तर यावर्षी 2021 मध्ये आज पर्यंत 10 जणांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला आहे.

उतावळी’ मध्ये खामगावातील युवकाचा मृत्यू

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साका येथील उतावळी प्रकल्यावर पिकनिकला जाणे एका युवकाच्या जीवावर बेतले आहे. याठिकाणी पोहत असतांना बुडून खामगावातील युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. येथील एकता नगर भागात राहणारे इम्रान हैदरअली, जुगल शर्मा, अन्वर खान, धीरजर्सिग रामभुवन ठाकूर हे चार तरुण काल १३ सप्टेंबर रोजी देऊळगाव साकर्शा येथील उतावळी प्रकल्प पाहण्यासाठी सायंकाळी ४ वाजेदरम्यान गेले होते. यावेळी हे तरुण प्रकल्पाच्या सांडव्यामध्ये उतरले असताना यापैकी धीरजसिंग ठाकूर ( २२ ) या तरुणाचा तोल गेल्याने तो सांडव्याच्या डोहात पडला, यावेळी त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो बुडाला. ही माहिती मिळताच गावचे सरपंच, पोलिस पाटील व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी माहिती दिल्यानंतर धीरजचे वडील व इतर नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले होते. 13 सप्टेंबर च्या सायंकाळपासून धरणात शोधकार्य सुरु होते. अखेर 14 सप्टेंबर रोजी सकाळी धीरजसिंगचा मृतदेह दिसून आला. तेथून त्याचा मृतदेह खामगाव येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून 15 सप्टेंबर त्याच्यावर अंत्यसंस्कार | करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. धीरज हा शहरातील सुपरिचित पेंटर रामभुवन यांचा मुलगा होता. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. देऊळगाव साकर्शा येथील उतावळी प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला असून हे नयनरम्य स्थळ पाहण्यासाठी दर रविवारी सदर धरणावर नागरिकांची गर्दी दिसून येते. या ठिकाणी गेल्यावर आपसूकच पोहण्याचा मोह आवरत नाही. मात्र सांडव्याच्या वाहत्या पाण्यात पोहणे धोकादायक असुन दुर्घटनेला निमंत्रण देणारे ठरत आहे. तरी याकडे प्रशासनाने लक्ष देवून उतावळी प्रकल्प प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्याची मागणी होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here