Home Breaking News महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाचा ग्रामसेवकाच्या वतीने बोजवारा!

महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाचा ग्रामसेवकाच्या वतीने बोजवारा!

अंढेरा/प्रतिनिधी
गावात दोन समाज गुण्यागोविंदाने नांदावे आपसी हेवेदावे विसरून गावातील वाद गावातच मिळवावे यासाठी स्व. आर आर पाटील (आबा) यांनी सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजनेलाच तालुक्यातील मौजे येवता येथे ग्रामसेवक खेडेकर व काही पदाधिकार्‍यांच्या वतीने हरताळ फासण्यात आली. आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मौजे यवता येथे आज दिनांक १४सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी सभा घेण्यात आली.परंतु सभेमध्ये कुठल्याही प्रकारचे नियोजन दिसले नाही. सभेला एकूण उपस्थित असलेल्या लोकांची मतमोजणी म्हणजेच सर्वांची होकार आदर्श स्थिती विचारात घेतली जाते परंतु आज ग्रामसभेत उपस्थित असलेल्या सदस्यांची बहुमत जणू श्री आर.आर.खेडेकर यांनी केलेच नाही.आर.आर.खेडेकर यांनी लागलीच अनिल चव्हाण यांचे नाव अध्यक्ष म्हणून घोषित केल्याने गोंधळ उडालेला आहे ग्रामसभेत गावातील वाद गावात मिटवण्याचे हेतूने हा तंटामुक्ती अध्यक्ष चा पदाचा कारभार खूप महत्त्वाचा समजला जातो कुणाचा घरचा वाद असो की शेतीचा वाद असो तेथे तंटामुक्ती समितीचे सदस्य जाऊन तो वाद गावात मिटंतो आणि पुढे कोर्ट कचेऱ्या व या वादाचे भयानक वादात रूपांतर होण्याचे थांबते. परंतु मौजे येवता येथे दोन समाजात हे पद आळीपाळीने वाटून घेण्याची प्रथा आहे .एकदा ओबीसी समाजाला तर एकदा मागासवर्गीय समाजाला मागच्यावेळी हे पण ओबीसी समाजाला असल्याने यावेळी नियमानुसार मागासवर्गीय समाजाची वेळ असल्याने हा मागासवर्गीय यावर अन्याय झाला असे मौजे येवता येथील मागासवर्गीय मतदार व सुजाण नागरिक यांचे आहे अशा आशयाचे निवेदन त्यांनी आज गट विकास अधिकारी तहसिलदार व पोलीस स्टेशन चिखली यांना देऊन सदर प्रकरणी योग्य कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा समस्त नागरिकांनी दिला आहे.गावात दोन समाज गुण्यागोविंदाने नांदावे आपसी हेवेदावे विसरून गावातील वाद गावातच मिळवावे यासाठी स्व. आर आर पाटील (आबा) यांनी सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजनेलाच तालुक्यातील मौजे येवता येथे ग्रामसेवक खेडेकर व काही पदाधिकार्‍यांच्या वतीने हरताळ फासण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here