Home Breaking News OBC आरक्षण :15 सप्टेंबर रोजी राज्यभर भाजपचे आंदोलन ; आमदार आकाश फुंडकर...

OBC आरक्षण :15 सप्टेंबर रोजी राज्यभर भाजपचे आंदोलन ; आमदार आकाश फुंडकर यांची माहिती

ओबीसी विरोधी महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध

 

ओबीसी समाजावरचा अन्याय सहन करणार नाही – आ.आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष भाजपा

आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही.

 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वेळखाऊ पणा व मिळमिळीत धोरणामुळे आज ओबीसी आरक्षण गमवावे लागले आहे. ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, जिल्हाभरातील भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष यांनी जिल्हा भरात तालुक्याच्या ठिकाणी हि आंदोलने करून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी केली.

 

यावेळी बोलतांना आ आकाश फुंडकर म्हणाले, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीपणाचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे.

 

 

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही आमदार आकाश फुंडकर म्हणाले.

 

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजावरील अन्याय सहन केला जाणार नाही. ओबीसी समाजाशिवाय निवडणुका कशा होऊ शकतात ? त्यामुळे ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी उद्या15 सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन करणार आहे.

तरी सर्व लोकप्रतिनिधी, प्रदेश पदाधिकारी, भाजपा जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व आघाडी प्रमुख, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ओबीसी समाज बांधव यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष भाजपा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here