Home जागर जिगांव प्रकल्पाला राष्ट्रमाता जिजाऊ महासागर नाव द्या : मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान

जिगांव प्रकल्पाला राष्ट्रमाता जिजाऊ महासागर नाव द्या : मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान

 

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानचे तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

संग्रामपूर : महाराष्ट्रात मातृतीर्थ म्हणून प्रख्यात असलेला जिल्हा,छत्रपती शिवरायांचे आजोळ अशा बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील पूर्णत्वास येत असलेल्या जिगाव प्रकल्पाला राष्ट्रमाता जिजाऊ महासागर हे नाव देण्यात यावे याकरिता मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना 14 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले.
सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की जिगाव प्रकल्प हा शेतकऱ्यांशी संबंधित आहे .जिजाउंचे शेतकऱ्यांसाठी असलेले योगदान संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे .जिजाऊंनी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या हिस्त्र पशूंचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना अभय दिले .बी-बियाणे ,गुरेढोरे पुरवली दुष्काळात शेतसारा माफ केला शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसा मिळावा याकरिता जगातील पहिली सहकारी बँक उघडुन शेतकऱ्यांना कर्ज दिले धरणे बांधली एवढे मोठे योगदान शेतकऱ्यांसाठी जिजाऊंचेआहे

म्हणून मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात पूर्णत्वास येत असलेल्या आणि शेतकऱ्यांसाठी वरदान मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला राष्ट्रमाता जिजाऊ महासागर हे नाव देण्यात यावे अशी मागणी मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान, बुलढाणा जिल्ह्याच्या माध्यमातून करण्यात आली.
या निवेदनावर संग्रामपुर तालुका अध्यक्ष दत्ता चिकटे तालुका उपाध्यक्ष योगेश ठाकरे, गणेश अवचार ऋषी झाडोकार, अतुल अवचार, दत्ता चिकटे ,योगेश ठाकरे, गणेश अवचार, ऋषी झाडोकार,अमोल उमाळे, अमोल हागे ,शरद अवचार, आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here