Home कृषि वार्ता शेतकऱ्यांना ९० टक्के सबसिडीवर मिळणार सौर कृषीपंप!

शेतकऱ्यांना ९० टक्के सबसिडीवर मिळणार सौर कृषीपंप!

 

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, : केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी https://www.mahaurja.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

अशी आहे कुसुम योजना

किसान उर्जा सुरक्षा आणि उत्थान महा अभियान (पीएम कुसुम योजना) योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाणारी योजना आहे, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौर पंप दिले जातील. या पंपांचा वापर करून शेतकरी आपल्या शेतात सिंचन करू शकतो आणि वीज देखील निर्माण करू शकतो. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 17.5 लाख डिझेल / इलेक्ट्रिक पंप सौर ऊर्जेवर चालवले जातील. त्याचबरोबर पुढील 10 वर्षात 3 कोटी कृषी उपयोगी पंपांचे सौरपंपांमध्ये रूपांतर करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 2020-21 च्या अर्थसंकल्पात 20 लाख शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी मदत केली जाईल.

केंद्र सरकारच्या 2018-19 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कुसुम योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत, 2022 पर्यंत लक्ष्यित 3 कोटी सौर ऊर्जा संयंत्रांची उभारणी करण्यासाठी एकूण खर्च 1.4 लाख कोटी रुपये असेल. त्यापैकी 48 हजार कोटी रुपये केंद्र सरकार देईल आणि तेवढीच रक्कम राज्य सरकार देईल. या कुसुम योजना 2020 (कुसुम योजना 2020) अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या फक्त 10 टक्के रक्कम भरावी लागेल, तर 48 हजार कोटींची रक्कम बँक कर्जाद्वारे केली जाईल. सबसिडीची रक्कम सरकार शेतकऱ्याच्या खात्यात देईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here