Home Breaking News मलकापूर-सोलापुर महामार्गावरील चौपदरीकरणानंतरही वाहतुकीचे तिन-तेरा! ; अपघातात वाढ!!

मलकापूर-सोलापुर महामार्गावरील चौपदरीकरणानंतरही वाहतुकीचे तिन-तेरा! ; अपघातात वाढ!!

 

अपघाताच्या संख्येत होत आहे वाढ ;ठेकेदाराकडुन प्रवासी निवारे बांधले चुकीच्या ठिकाणी!

अंढेरा/प्रतिनिधी
मागील दोन ते तीन वर्षांपासून मलकापूर सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.सदर काम हे अंतिम टप्प्यात असून जवळपास दोन्ही साईडने चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाले असुन इतर सुचना फलक व रंगरंगोटीचे कामे सुरू आहेत.महामार्गाच्या दोन्हीही बाजुचे चौपदरीकरणाचे काम ज्या ज्या ठिकाणी पुर्ण झाले आहे.त्याठिकाणी अजुनही दोन्ही बाजूला रोड वाहतूकीसाठी खुला केलेला नसुन महामार्गावरील मोठमोठाले वाहन धारक हे कुठुनही आपले जड वाहने चालवत असल्याने कोणती साईड जाणारी व कोणती साईड येणारी हे कळत नसल्यामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असुन याकडे संबंधित कामाचे ठेकेदार पुर्णपणे दुर्लक्ष होत करत असुन दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढच होत असुन आतापर्यंत अनेक निरपराध जणांना आपल्या प्राणांस मुकावे लागले.

आंचरवाडी फाट्यावर झाले अनेक अपघात!
आंचरवाडी फाटा हा वाकणात येत असुन चिखलीकडुन सदर रोड दोन्ही साईडला खुला असुन आंचरवाडी फाट्यावर देऊळगाव राजा जाताना एकच साईड खुली असल्याने प्रवाशांना अंदाज येत नसल्याने तसेच आंचरवाडी फाट्यावरुन गावात शिरताना अनेक मोटारसायकल स्वाराची धडक लागुन अपघात झाले असुन अनेक जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले.हीच परिस्थिती आता अंढेरा फाट्यावर झाली असुन मोठमोठाले वाहने हे कुठुनही घुसत असुन अंढेरा गावात शिरताना अपघाताच्या संख्येनत वाढ होत आहे.याकडे संबंधित ठेकेदार हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.

महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून महामार्गावरील फाट्यावरील प्रवासी निवारे हे फाट्याला लगुनच बांधायला पाहिजे असताना फाटा सोडुन खुप लांब-लांब प्रवासी निवारे बांधले असुन प्रवासी निवारा ते फाटा अंतर खुप जास्त झाल्याने संबंधित ठेकेदार यांनी कुठल्या निष्कर्षाने प्रवासी निवारे बांधले आहे.याबाबत विचारणा केली असता वनविभागाने नेमुन दिलेल्या ठिकाणीच आम्ही प्रवासी निवारे बांधले असल्याचे संबंधित ठेकेदार शहा यांनी सांगितले.
याबाबत वनविभागाचे वनाधिकारी एस.एस.डुबे यांना याबाबत विचारणा केली असता महामार्गावरील प्रवासी निवारे आणि आमचा कुठलाही संबंध येत नसुन आम्हाला प्रवासी निवाराबाबत काहीही देणेघेणे नसल्याचे सांगण्यात आले.आम्ही फक्त महामार्गावरील गतिरोधक आणि ज्या ठिकाणी जंगल येते त्या ठिकाणी वन्यप्राण्यांपासुन सावधान असे पोस्टर लावण्याचे सांगितले आहे.


यावरुन महामार्गावरील संबंधित ठेकेदार हे प्रशासनाची दिशाभूल करत असुन मलकापूर-सोलापुर महामार्गावरील सर्वच प्रवासी निवारे हे फाटे सोडुन का बांधण्यात आले?तसेच सदर प्रवासी निवारे हे निकृष्ट दर्जाचे बांधले असुन सध्या पावसाळयाचे दिवस सुरू असुन जर प्रवासी निवार्यात थांबले तर पुर्ण पणे ओळे झाल्याशिवाय राहणार नाही.या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी सामान्य जनमाणसातुन होत आहे.तसेच पुर्वीप्रमाने अंढेरा फाट्याला लागुनच प्रवासी निवारा बांधण्याची मागणी अंढेरा तसेच पिप्री आंधळे वासीयांकडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here