Home Breaking News जळगांव जामोद पोलीसांनी 2 लाख 80 हजार रु किमतीच्या मोटर सायकल चोरीचा...

जळगांव जामोद पोलीसांनी 2 लाख 80 हजार रु किमतीच्या मोटर सायकल चोरीचा लावला छडा

गणेश भड

जळगाव जामोद : दि 12 सप्टेंबर: 11 सप्टेंबर रोजी जळगाव पोलीस स्टेशनला गुप्त बातमीदारांकडून माहीती मिळाली, मोहन भास्कर गोरे व रविंद्र प्रल्हाद शिंदे दोन्ही रा जामोद यांचेकडे दोन विना नंबरचा चोरीचा मोटर सायकली असुन त्या मोटर सायकली ते विकण्याचा तयारीत आहे अशी माहीती मिळाल्यावरून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता ग्राम जामोद येथे बसस्टॉप जवळील सर्वज्ञ सर्विसिंग सेन्टर मोहन भास्कर गोरे वय 22 वर्ष रा जामोद यांचेकडे होन्डा शाईन कंपणीची विना नंबरची मोटर सायकल किमत अंदाजे 40000 रुपयांची मिळुन आली तसेच रविद्र प्रल्हाद शिंदे वय 30 वर्ष यांचेकडे लाल काळया पट्याची विना नंबरची होन्डा शाईन कंपणीची मोटारसायकल अंदाजे किमत 40000 रुपये मिळुन आली त्या दोघांना गाडीच्या कागदपत्राबाबत तसेच मालकी हक्कबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडविचे व असामधानकारक उत्तर दिली त्यांचा ताब्यात मिळुन आलेल्या दोन्ही मोटर सायकलचे चेचीस नंबर खोडलेले दिसले तसेच दोन्ही गाडयांचे समोरील व मागील नंबर प्लेटवरील नंबर काढलेले दिसला आम्ही केलेल्या चौकशीमध्ये त्या दोघांनी गाड्यांचे मालकी हक्काबाबत कोणतीही कायदेशीर कागदपत्रे न दिल्याने व आम्हास सदर मोटर सायकल या चोरीचा असल्याबाबत आमची खात्री त्या दोघांनकडुनही नमुद वर्णनांचा होन्हा शाईन कंपणीचा दोन मोटर सायकलली मिळुन आल्याने सदर मोटर सायकल त्यांचे कडुन जप्ती पंचनाम्याप्रमाणे पंचासमक्ष जप्त करुन दोन्ही आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करून मा प्रथम वर्ग न्यायलय जळगांव जामोद येथे पोलीस कस्टडी रिमांड करीता हजर केले असता मा मा प्रथम वर्ग न्यायलय जळगांव जामोद यानी सदर आरोपीचा 03 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिला होता सदर रिमांड दरम्यान त्यानी अजुन होन्डा घाईन कंपणीचा 05 गाडया दिल्या अशा एकुन 07 मोटर सायकल किमत अंदाजे 2,80000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला

सदरची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक अरविद चावरीया यांचा आदेशाने व अपर पालीस अधिक्षक हेमराजसिंग राजपुत, उपविभाीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुनिल अंबुलकर, पोउपानि सचिन वाकडे,पो हे काँ संजय राउत, नापोशि उमेश शेगोकार, नापोशि भागवत उंबरहांडे, पोशि दाते ,पोशि वसंतकार, पोशि सदुके, पोशि सचिन राजपुत यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here