Home Breaking News नागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा!

नागाचा सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला दोन तास विळखा!

वर्धा :सहा वर्षीय मुलीच्या गळ्याला नाग साप सुमारे दोन तास विळखा देऊन बसला होता, तो तिच्या हाताला चावला आहे. पूर्वा पद्माकर गडकरी असे या मुलीचं नाव आहे. धाडसी मुलीने हिंमत हारली नाही. तिने मोठे धाडस दाखवले आणि दोन तास लढा दिला. अखेर, सापाचा विळखा सूटताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात आयसीयू युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. या मुलींची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांची चमू पूर्वाच्या प्रकृती प्रकृतीवर लक्ष ठेवून असून सापाने चावा घेतल्याने तिच्या हातावर सूज आलेली आहे घरात जमिनीवर झोपून असलेल्या पूर्वाच्या गळ्याभोवती नागाने तब्बल दोन तास ठाण मांडले नंतर फना काढुन सहा वर्षे पुजा च्या हाताला चावा घेतला त्यानंतर दिवाना खाली गेलेला नाग दिसेनासा झाला त्याला तातडीने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तिची परिस्थिती हलाखीची असून वडील मूकबधिर आहेत तर आई मोलमजुरी करते.

पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here