Home Breaking News चिमुकल्या मुलांचा असाही जीवन संघर्ष; दर १५ दिवसाला लागते रक्त! थॅलेसिमीया ग्रस्त...

चिमुकल्या मुलांचा असाही जीवन संघर्ष; दर १५ दिवसाला लागते रक्त! थॅलेसिमीया ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान करण्यासाठी पुढे या !

नांदुरा: रक्त हे कुठल्याही कारखान्यात बनवल्या किंवा शेतीतून त्याचे उत्पादन घेतल्या जात नाही त्याची मानवाच्या शरीरातच निर्मिती होते आपल्या आजूबाजूलाच समाजात काही निष्पाप व निरागस चिमुकल्यांना थॅलेसीमीया या असाध्य आजाराने ग्रासल्याने त्यांच्या शरीरात रक्तच निर्माण होत नसल्याने त्यातील काहींना दर ३०दिवसाला तर काही रुग्णांना चक्क १५दिवसालाच रक्त चढवावे लागते आपल्याला मानव देह मिळाला तो परोपकारासाठी आयुष्यात आपल्या एका मदतीच्या हाताने जर कोण्या रुग्णाच्या ,दुखीताच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असेल तर त्यापेक्षा मोठे पुण्य नाही.

आजाराबाबत माहिती

थॅलेसेमिया हा खूप गंभीर आजार आहे. जेनुकिय बिघाद झाल्याने थॅलेसेमिया हा आजार बळावतो. तसेच हा एक आनुवंशिक आजार आहे. म्हणजेच हा आजार आई- वडिलांमुळे मुलांना होत असतो. या आजारामुळे शरिरात रक्त बनणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. तर शरिरातील लाल रक्तपेशींची संख्या १२० दिवसांच्या जागी १५ दिवस पुरेल इतकेच असते. त्यामुळे अशक्तपणा येतो आणि त्यामुळे इतर आजार ही जडण्याची शक्यता असते. या आजारावर वेळीस उपचार केले नाही तर या आजारांनी त्रस्त रूग्णाचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते.

थॅलेसेमियाचे दोन प्रकार

थॅलेसेमिया हा आजार ‘थॅलेसेमिया मायनर’ आणि ‘थॅलेसेमिया मेजर’ अशा दोन प्रकारात असतो. ‘थॅलेसेमिया मायनर’ हा आजार असतो मात्र तो सहज रित्या लक्षात येत नाही. हे रूग्ण सर्वसाधारांप्रमाणे आपले जीवन जगत असतात. तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचे आजाराची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे आपण ‘थॅलेसेमिया मायनर’चे रूग्ण आहोत हे त्यांना कळत ही नाही. त्यामुळे ज्यांना ‘थॅलेसेमिया मायनर’ हा आजार आहे. त्यांच्या मुलांनमध्ये ‘थॅलेसेमिया मेजर’ या आजाराची लक्षणे दिसून येतात. तसेच त्यांच्या बाळामध्ये जन्म झाल्यानंतर ४-६ महिन्यामध्ये ‘थॅलेसेमिया मेजर’ या आजाराची लक्षणे दिसू लागतात. तसेच या आजाराचे निदान झाल्या नंतर त्यांना १५ ते ३० दिवसांनी बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो.

थॅलेसेमियाची लक्षणे

अशक्तपणा
थकवा
शरिर पिवणे पडणे
शरिरातील विकास कमकूवत होणे
हृदयाच्या समस्या उदभवणे
आयर्न आधिभार
अस्थी विकृती
थॅलेसेमिया आजाराने त्रस्त रूग्णांना मदत करणारी संस्था
भारतामध्ये थॅलेसेमिया या आजार जडलेल्या रूग्णा मदत करण्यासाठी ‘द विशिंग फॅक्ट्री’ ही संस्था मदत करते. तसेच या संस्थेचे ध्येय हे आहे की या आजारांने पीडित रुग्णांना चांगल्यात चांगली उपलब्ध करू देणे.

या मंडळाने घेतला पुढाकार

या थॅलेसिमीया रुग्णांसाठी युवकांनी, सुजाण नागरीकांनी, गणेशोत्सव मंडळ,दुर्गादेवी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ,विविध सामाजिक सेवाभावी संस्थांनी आपणही या समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने रक्तदानासाठी पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन गांधी चौकातील चंद्रशेखर आझाद क्रिडा व व्यायाम प्रसाकर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
सदर महारक्तदान शिबीर दि १६सप्टेंबर २०२१ गुरुवार ला सकाळी ९ते दुपारी ३वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह(न प टाऊन हॉल)येथे आयोजित करण्यात आले आहे

 

सामाजिक बांधीलकी जोपासत थॅलेसिमीया ग्रस्त रुग्णांसाठी युवकांनी पुढे येऊन रक्तदान करावे जेणेकरून सामाजिक, धार्मिक, राष्ट्रीय कार्य केल्याच पुण्य मिळेल.

आचार्य हरीभाऊ वेरुळकर गुरुजी

कोविडमुळे यावर्षीचा गणेशोत्सव तरुणांनी आरोग्य उत्सव साजरा करीत थॅलेसिमीया आजाराने ग्रस्त चिमुकल्यांसाठी रक्तदान करुन सामाजिक भान जोपासावे.


– आमदार राजेश एकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here